...जेव्हा सचिनने गोलंदाजीत कमाल केली

...जेव्हा सचिनने गोलंदाजीत कमाल केली

1993 मध्ये दक्षिण आफ्रिका तर 1997 साली आॅस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना सचिनने ही अफलातून कामगिरी बजावलीय.

  • Share this:

24 एप्रिल : सचिनच्या फलंदाजीबद्दल आपण नेहमीच बोलत असतो. परंतु अनेकदा सचिनने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांनाही पळता भुई थोडी केलीय. म्हणूनच जाणून घेवूयात 'गोलंदाज सचिन'बद्दल...

एकदिवसीय सामन्यातील अखेरच्या षटकात सहा किंवा त्यापेक्षा कमी धावा डिफेंड करणे म्हणजे आव्हानात्मक गोष्ट. अशा वेळी अनेक हुकमी गोलंदाजांचीही दमछाक होते. मात्र मास्टर ब्लास्टरने दोनदा ही किमया साधलीय.

1993 मध्ये दक्षिण आफ्रिका तर 1997 साली आॅस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना सचिनने ही अफलातून कामगिरी बजावलीय.

योगायोग म्हणजे दोन्हीही वेळी सचिन सामन्यातील पहिल्यांदाच गोलंदाजी करत होता. सचिनच्या गोलंदाजीतील कामगिरीत सातत्य नसले तरीही त्याने अनेकदा मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभारणाऱ्या सचिनने बळींचेही व्दिशतक पूर्ण केलंय. त्याने कसोटीत 46,एकदिवसीय सामन्यांत 154 तर ट्वेंटी-20 मध्ये 1 बळी अशी कामगिरी सचिनच्या नावावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 05:20 PM IST

ताज्या बातम्या