मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

फुटबॉल वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' कर्णधाराला मैदानावरच हार्ट अॅटॅक!

फुटबॉल वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' कर्णधाराला मैदानावरच हार्ट अॅटॅक!

 हार्ट अटॅक आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.

हार्ट अटॅक आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.

हार्ट अटॅक आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.

रोम, 1 एप्रिल : स्पेनला पहिल्यांदा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकून देणारा गोलीकीपर आणि माजी कर्णधार इकर कासियासला मैदानावरच हार्ट अॅटॅक आला. इटलीतील फुटबॉल क्लब पोर्टोसाठी कासियास खेळतो. 37 वर्षीय कासियासला सरावावेळी हार्ट अॅटॅक आला. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या कासियासला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इकर कासियासला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. कासियासच्या नेतृत्वाखाली 2010 मध्ये स्पेननं फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला होता. फायनलला नेदरलँडला हारवून स्पेन जगज्जेता ठरला होता. कासियासला बेस्ट गोलिकीपर निवडले होते. त्याला गोल्डन ग्लोव्हज मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये कासियासनं फक्त दोन गोल दिले होते. त्याने उपांत्यपूर्व सामन्यात पेनल्टीसुद्धा वाचवली होती. SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट
First published:

Tags: Football, Spain

पुढील बातम्या