Home /News /sport /

IND vs SA : भारताविरुद्धच्या सीरिजआधी ICC चा दक्षिण आफ्रिकन खेळाडूला धक्का, 9 महिने बंदी, 31 रनही कापल्या!

IND vs SA : भारताविरुद्धच्या सीरिजआधी ICC चा दक्षिण आफ्रिकन खेळाडूला धक्का, 9 महिने बंदी, 31 रनही कापल्या!

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 9 जूनपासून 5 टी-20 मॅचची सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला धक्का लागला आहे.

  मुंबई, 18 मे : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 9 जूनपासून 5 टी-20 मॅचची सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला धक्का लागला आहे. डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचा बॅटर जुबैर हमजा (Zubayr Hamza) याला 9 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पार्लमध्ये 17 जानेवारी 2022 ला स्पर्धेदरम्यान हमजाचे नमुने घेण्यात आले होते, यामध्ये बंदी असलेला पदार्थ फुरोसेमाईडचे अंश सापडले होते. हा पदार्थ वाडाच्या प्रतिबंधीत यादीतला आहे. जुबैर हमजाने त्याच्यावर झालेले आरोप स्वीकारले आहेत, त्यामुळे त्याच्यावर 22 मार्च 2022 ते 22 डिसेंबर 2022 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. यासतोबत 17 जानेवारी ते 22 मार्च दरम्यान त्याने केलेली वैयक्तिक कामगिरीही ग्राह्य धरली जाणार नाही. हमजाने दक्षिण आफ्रिकेसाठी 6 टेस्ट आणि 1 वनडे मॅच खेळली आहे. त्याला 31 रन (25 आणि 6) गमवाव्या लागणार आहेत, ज्यात त्याने या काळात बनवल्या. 26 वर्षांच्या जुबैरने 6 टेस्टमध्ये एकूण 212 रन केल्या आहेत, पण त्याच्या न्यूझीलंडविरुद्धच्या 31 रन रद्द करण्यात येणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जून ते 19 जून दरम्यान 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. IND vs SA T20 Series : मुंबई ड्रग्ज पार्टीत अडकलेल्याचं कमबॅक; आफ्रिकन टीमची निवड दक्षिण आफ्रिकेची टीम टेम्बा बऊमा, क्विंटन डिकॉक, रीझा हेन्ड्रीक्स, हेनरिच क्लासीन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्किया, वेन पारनेल, ड्वॅन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, मार्को जेनसन भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजचं वेळापत्रक
  9 जून- पहिली टी-20, दिल्ली 12 जून- दुसरी टी-20, कटक 14 जून- तिसरी टी-20, विशाखापट्टणम 17 जून- चौथी टी-20, राजकोट 19 जून- पाचवी टी-20, बँगलोर
   
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: South africa, Team india

  पुढील बातम्या