Home /News /sport /

दक्षिण आफ्रिका क्रिकेटवर पुन्हा निलंबनाची टांगती तलवार

दक्षिण आफ्रिका क्रिकेटवर पुन्हा निलंबनाची टांगती तलवार

दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित होण्याची टांगती तलवार आहे. बोर्डाने गैरवर्तन केल्यामुळे सरकार हस्तक्षेप करु शकतं, असं दक्षिण आफ्रिका सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

    केपटाऊन, 14 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित होण्याची टांगती तलवार आहे. बोर्डाने गैरवर्तन केल्यामुळे सरकार हस्तक्षेप करु शकतं, असं दक्षिण आफ्रिका सरकारकडून सांगण्यात आलं आहे. याबाबत आयसीसीला माहिती देण्यात आल्याचं क्रीडा मंत्री नाथी मेथेथवा यांनी सांगितलं आहे. आयसीसीच्या संविधानानुसार क्रिकेट बोर्डात सरकारी हस्तक्षेप असू शकत नाही, अशाप्रकारे सरकारने हस्तक्षेप केला, तर त्या देशाच्या टीमला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापासून रोखलं जाऊ शकतं. दक्षिण आफ्रिका सरकार आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकी (CSA) यांच्यात बऱ्याच काळापासून बोर्डाच्या चौकशीमुळे तणाव आहे. या चौकशीनंतर ऑगस्ट महिन्यात क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची सीईओ थबांग मरोई यांच्यावर गंभीर गैरवर्तनाचे आरोप करत त्यांना बरखास्त करण्यात आलं होतं. पण क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने चौकशीचा हा रिपोर्ट सार्वजनिक करायला नकार दिला. तसंच सरकारशी जोडल्या गेलेल्या खेळ महासंघ आणि ऑलिम्पिक समितीकडून क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या चौकशीलाही विरोध केला. अखेर बोर्डाने दोन महिन्यांनंतर फॉरेन्सिक चौकशीचा रिपोर्ट जाहीर केला. मागच्या बऱ्याच कालावधीपासून दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड वंशवाद, भ्रष्टाचार आणि खेळाडूंच्या वेतनावरुन वादात सापडलं होतं. साऊथ आफ्रिकन स्पोर्ट्स ऍण्ड ऑलिम्पिक कमिटीने पत्र लिहून बोर्डाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पदावरून काढायला सांगितलं आहे. एसएएससीओसी दक्षिण आफ्रिकेतली खास संस्था आहे जी सरकार आणि क्रीडा संस्थांमधला दुआ म्हणून काम करते. एसएएससीओसीने मागच्या वर्षी क्रिकेट बोर्डातल्या गडबडींच्या चौकशीला सुरुवात केली होती. या चौकशीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर बोर्डावर ही कारवाई करण्यात आली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या