World Cup : आयपीएल गाजवणारा 'हा' गोलंदाज वाढवणार भारतीय संघाची डोकेदुखी

World Cup : आयपीएल गाजवणारा 'हा' गोलंदाज वाढवणार भारतीय संघाची डोकेदुखी

रबाडा तंदुरुस्त झाल्यानं भारतीय संघासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

  • Share this:

जोहान्सबर्ग, 13 मे : आयपीएलच्या बाराव्या हंगामात विदेशी खेळाडूंची चलती होती. यात गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये फक्त विदेशी खेळाडूची आघाडीवर होते. मात्र साऊथ आफ्रिकेचे जलद गोलंदाज कगिसो रबाडा यानं काही सामन्यातच आयपीएलमध्ये आपली जागा बनवली. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या रबाडानं 12 सामन्यात 25 विकेट घेतल्या. मात्र त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळं रबाडाला मायदेशी परतावं लागलं.

रबाडा साऊथ आफ्रिकेच्या विश्वसंघातही सामिल असून, साऊथ आफ्रिकेचा तो महत्त्वाचा गोलंदाज आहे. मात्र आयपीएलच्या दुखापतीनंतर त्याला विश्वचषकात खेळायला मिळेल का, याबाबत साशंकता होत्या. दरम्यान आता, रबाडा फिट झाला असून तो, 30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात सामिल होणार आहे. यासंदर्भात साऊथ आफ्रिका क्रिकेट बोर्डनं , “रबाडाच्या दुखापतीवर आमची नजर आहे. येत्या दोन-तीन आठवड्यात तो तंदुरुस्त होईल. विश्वचषकाआधी तो पुर्णपणे फिट असले. साऊथ आफ्रिका संघासाठी रबाडा महत्त्वाचा खेळाडू असल्यामुळं त्याच्याकडून अपेक्षा आहेत”, असे सांगितले.

दरम्यान रबाडा तंदुरुस्त झाल्यानं भारतीय संघासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार आहे. भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात 5 जूनला सामना होणार आहे. दरम्यान इंग्लंडच्या खेळपट्टीवर रबाडाच्या जलद गोलंदाजीमुळं भारतीय फलंदाजांची चिंता वाढणार आहे.

एनगिडी आणि स्टेन यांच्याबाबत सस्पेंस कायम

साऊथ आफ्रिकेचा जलद गोलंदाज रबाडा तंदुरुस्त झाला असला तरी, लुंगी एनगिडी आणि डेल स्टेन हे जलद गोलंदाज फिटी आहेत की नाही याबाबत काही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळं आता साऊथ आफ्रिकेचे हे जलद गोलंदाज विश्वचषकाआधी फिट असतील का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान फाफ ड्युप्लेसिसच्या नेतृत्वाखाली साऊथ आफ्रिकेचा संघ मुख्य सामन्याआधी श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्या विरोधात सराव सामना खेळणार आहे.

वाचा- MI vs CSK : फायनलमध्ये 'तू-तू, मैं-मैं', धोनीनं केला मोठा खुलासा

वाचा- पंचांसमोर अॅटिट्यूड दाखवणं पोलार्डच्या अंगलट, बर्थ डेला मिळालं शिक्षेचं गिफ्ट

निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: May 13, 2019, 5:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading