दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा सहा गडी राखून पराभव

दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा सहा गडी राखून पराभव

यजमानांनी भारताचं आवाहन सहजपणे पूर्ण करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबर केली आहे. त्यामुळे या मालिकेतील शनिवारी होणारा अंतिम टी-२० सामाना निर्णायक ठरणार आहे.

  • Share this:

सेंच्युरियन, 22 फेब्रुवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या दुसऱ्या टी-२० समान्यामध्ये यजमान संघानं पाहुण्या संघावर सहा गडी राखून विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या जे.पी. ड्युमिनीच्या संघासमोर भारतीय संघाने २० षटकांमध्ये १८९ धावांचे आवाहन ठेवले. यात ड्युमिनी आणि विकेटकीपर फलंदाज हेन्रिक क्लासेन या दोघांनी जबरदस्त खेळी करून गड राखला आहे.

यजमानांनी भारताचं आवाहन सहजपणे पूर्ण करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबर केली आहे. त्यामुळे या मालिकेतील शनिवारी होणारा अंतिम टी-२० सामाना निर्णायक ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला पण त्यांची सुरूवात काही चांगली झाली नाही. चौथ्या षटकातच जे जे स्म्ट्स अवघ्या 2 धावांमध्ये बाद झाला. दुसरा ओपनर हेन्डरीक्स याने चांगली खेळी केली, परंतु शार्दुल ठाकूरने पाचव्या षटकातच त्याला बाद केलं. यानंतर विकेटकीपर क्लासेनने पहिल्या 10 षटकात 85 धावा केल्या. 12व्या षटकात क्लासेनने 22 चेंडूत एक अर्धशतक झळकावलं. हे त्यांच्या टी-20 क्रिकेटचा पहिला अर्धशतक होता. जेव्हा उनादकटने 14व्या षटकात 69 धावा करत त्याला आऊट केलं.

यानंतर, पांड्याने डेव्हिड मिलरला पाच धावांत बाद केलं, पण त्यानंतर कॅप्टन जे. पी. ड्युमिनीने जबरदस्त 16 धावांच्या भागीदारीसह पाचव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. आणि आपल्या टीमला जिंकून दिली. ड्युमिनीने 40 चेंडूंत नाबाद 64 धावा फटकावताना 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याच्या आक्रमक खेळीमुळेच त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडलं गेलं. बेहरादीननेही १० चेंडूत नाबाद १६ धावांची उपयक्त खेळी केली. उनाडकटने २, तर शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

संघ अडचणीत असताना मोक्याच्यावेळी मनिष पांड्ये (७९*) आणि महेंद्रसिंग धोनी (५२*) यांनी झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १८८ धावांची आव्हानात्मक मजल मारली. ज्यूनिअर डाला याने दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवत भारतीय फलंदाजीला हादरे दिल्यानंतर मनिष - धोनी यांनी ९८ धावांची नाबाद भागीदारी केली. पहिले षटक निर्धाव खेळल्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर डालाने रोहित शर्माला बाद केले. यानंतर शिखर धवन (२४) व अनुभवी सुरेश रैना (३१) यांनी ४४ धावांची भागीदारी करत भारताला सावरले. ड्युमिनीने धवनला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात डालाने विराट कोहलीला (१) बाद करुन भारताची अवस्था ३ बाद ४५ अशी केली.

रैनाने २४ चेंडूत ५ चौकार लगावले. यावेळी भारताचा डाव ११व्या षटकात ४ बाद ९० धावा असा घसरला होता. परंतु, मनिष - धोनी यांनी सावध सुरुवातीनंतर चौफेर फटकेबाजी करत यजमानांची धुलाई करुन भारताला आव्हानात्मक मजल मारुन दिली. मनिषने ४८ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७९, तर धोनीने २८ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५२ धावांचा तडाखा दिला.

First published: February 22, 2018, 7:39 AM IST

ताज्या बातम्या