News18 Lokmat

चौथ्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार द.आफ्रिका विजयी

दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पाच गडी राखून पराभव केला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2018 10:24 AM IST

चौथ्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार द.आफ्रिका विजयी

11 फेब्रुवारी : चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पराभव करत मालिकेतलं आपलं आव्हान कायम ठेवलंय. दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पाच गडी राखून पराभव केला. भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २९० धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला विजयी घोषित करण्यात आलं.

त्यापूर्वी कोहली आणि धवन या जोडीनं शतकी भागीदारी केली.तर धोनीनंही जोरदार फटकेबाजी केली.

भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 290 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला सात षटकात एक बाद 43 धावा असताना पावसाचा व्यत्यय आला. या पावसाच्या व्यत्ययानंतर 12 वाजताच्या सुमारास पुन्हा सामना सुरु करताना डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 28 षटकांमध्ये 208 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात संथ गतीने झाली. जे पी ड्युमिनी अवघ्या दहा धावांवर बाद झाला. त्यानंतर धडाकेबाज फलंदाज हाशिम आमला सुद्धा लवकर तंबूत परतला. त्याला गोलंदाज कुलदीप यादवने 33 धावांवर झेलबाद केले. एबी डिव्हिलियर्सने शानदार खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. एबी डिव्हिलियर्सने दोन षटकार आणि एक चौकार लगावत 18 चेंडूत 26 धावा केल्या. अँडीला फ्लिकुद्द्वे आणि हेन्रिच क्लासेन यांनी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2018 10:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...