दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट कर्णधाराने केले त्याच टीमच्या महिला गोलंदाजाशी लग्न

दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट कर्णधाराने केले त्याच टीमच्या महिला गोलंदाजाशी लग्न

आफ्रिकेच्या या दोन्ही स्टार खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबत बिग बॅश क्रिकटमध्येही सहभाग घेतला आहे

  • Share this:

क्रिकेट खेळाडूंचं लग्न होणं ही काही नवी गोष्ट नाही. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या खेळाडूचं लग्न होतंच असतं. आता तुम्ही म्हणाल की, यात काय नवीन. पण दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघातील दोन खेळाडूंनी लग्न करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. टीमची कर्णधार डेन वेन निकर्कने तिच्याच टीममधील गोलंदाज मॅरिजाने कैपशी विवाह केला. शनिवारी झालेल्या या विवाह समारंभाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

💍

A post shared by Marizanne Kapp (@kappie777) on

या लग्नाला दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण महिला क्रिकेट टीम उपस्थित होती. मॅरीजाने ही दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू आहे. 25 वर्षीय वेन निकर्क गोलंदाज आहे. आफ्रिकेच्या या दोन्ही स्टार खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबत बिग बॅश क्रिकटमध्येही सहभाग घेतला आहे. सिडनी सिक्सर्स या टीमकडून दोघींनी अनेक सामने खेळले आहेत. सगळ्याच गोष्टी एकत्र करणाऱ्या या दोघींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातही साधारणपणे एकत्रच पदार्पण केले होते.

2009 मध्ये खेळण्यात आलेल्या महिला विश्व कप स्पर्धेदरम्यान 8 मार्चला वेस्टइंडिजविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याच्या दोन दिवसांनंतर 10 मार्चला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कैपने क्रिकेट जगतात पदार्पण केले होते.

First published: July 10, 2018, 12:19 PM IST

ताज्या बातम्या