SA vs PAK : बॉल कुठे आणि पळतो कुठे! फिल्डिंगमुळे पाकिस्तानी खेळाडू पुन्हा ट्रोल, VIDEO

SA vs PAK : बॉल कुठे आणि पळतो कुठे! फिल्डिंगमुळे पाकिस्तानी खेळाडू पुन्हा ट्रोल, VIDEO

पाकिस्तानी क्रिकेटपटू (Pakistan Cricket) त्यांच्या विनोदी फिल्डिंगमुळे कायमच सोशल मीडियावर ट्रोल होताना पाहायला मिळतात. यावेळी शर्जील खान (Sharjeel Khan) याने ट्रोलर्सना ही संधी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : पाकिस्तानी क्रिकेटपटू (Pakistan Cricket) त्यांच्या विनोदी फिल्डिंगमुळे कायमच सोशल मीडियावर ट्रोल होताना पाहायला मिळतात. यावेळी शर्जील खान (Sharjeel Khan) याने ट्रोलर्सना ही संधी दिली आहे. शरजील खान याचा पाकिस्तानसाठीचा चार वर्षानंतरचा हा पहिलाच सामना होता. काहीच दिवसांपूर्वी शरजीलच्या फिटनेसवरही मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात आली होती, आता खराब फिल्डिंगमुळे त्याच्यावर पुन्हा निशाणा साधण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa vs Pakistan) दुसऱ्या टी-20 मध्ये हा प्रकार घडला.

13 व्या ओव्हरमध्ये उस्मान कादीर जॉर्ज लिंडे याला बॉल टाकत होता. कादीरने टाकलेल्या गुगलीवर लिंडेने लॉन्ग ऑनच्या दिशेने हवेत फटका मारला, पण बॉल बॅटच्या मधोमध बसला नाही. बॅटच्या खालच्या बाजूला बॉल लागल्यामुळे लॉन्ग ऑनवर उभ्या असलेल्या शरजीलच्या दिशेने कॅच गेला, पण त्याने कॅच पकडताना गोंधळ घातला. यानंतर लॉन्ग ऑफला उभा असलेला फिल्डर आला आणि त्याने बाऊंड्री वाचवली.

या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेटने विजय झाल्यामुळे आता 4 मॅचची सीरिज बरोबरीत आहे. पहिले बॅटिंग करत पाकिस्तानने 9 विकेट गमावून 140 रन केले. कर्णधार बाबर आझमने 50 बॉलमध्ये 50 रनची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेसाठी लिंडेने 23 रन देऊन 3 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 14 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. ओपनर एडन मार्करमने 30 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली.

Published by: Shreyas
First published: April 13, 2021, 7:37 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या