मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA: विराट कोहली द्रविडसोबत दिसला फुटबॉल खेळताना, VIDEO व्हायरल

IND vs SA: विराट कोहली द्रविडसोबत दिसला फुटबॉल खेळताना, VIDEO व्हायरल

Rahul Dravid

Rahul Dravid

टीम इंडिया टेस्ट आणि वनडे सीरीजसाठी साउथ अफ्रीकामध्ये(India tour of south africa) पोहचली आहे.

नवी दिल्ली, 18 डिसेंबर: टीम इंडिया टेस्ट आणि वनडे सीरीजसाठी  साउथ अफ्रीकामध्ये(India tour of south africa) पोहचली आहे.  या दौऱ्यापूर्वी क्रिकेट जगतात अनेक घडामोडी घडल्या. वनडे कॅप्टन्सी काढून घेतल्याने विराट कोहली (Virat Kohli)आणि बीसीसीआयमध्ये (BCCI) वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले. अशातच विराट कोहली कोच राहुल द्रविडसोबत (Rahul Dravid) फुटबॉल खेळताना दिसला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

साउथ अफ्रीकाविरुद्ध पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने टीम इंडियाचा प्रॅक्टीस सेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीमध्ये विराट कोहली कोच राहुल द्रविडसोबत फुटबॉल खेळताना दिसला आहे.

जायबंदी झाल्याने टेस्ट टीमचा उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये, गेल्या तीन दिवसांपासून आम्ही मुंबईमध्ये क्वारंटाईन होतो. 10 तासांच्या मोठ्या प्रवासानंतर साउथ अफ्रीकामध्ये पोहचलो. आणि पुन्हा आम्ही एका दिवसासाठी क्वारंटाइनमध्ये आहे. अशी भावना स्ट्रेंथ एंड कंडिशनिंग कोच सोहम देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच ते पुढे म्हणाले, खेळाडूंनी रनिंगसोबत इतर स्किल्सवरदेखील अधिक जोर दिला आहे. ट्रेनिंग काही दिवसांत सुरु होइल. खेळाडूंन खेळावर फोकस केले आहे. रोहित जायबंदी झाल्याने केएल राहुल (KL Rahul)सोबत मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) ओपनिंगची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

मयंक न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये शतक झळकावले होते.

विराट VS बीसीसीआय

कोहलीला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. ही गोष्ट आपल्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची निवड करण्याच्या दीड तास आधी निवड समितीने सांगितली, असं विराट म्हणाला होता. आपण विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगितलं होतं पण तो ऐकला नाही, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिली होती. विराटने मात्र आपल्याला असं काहीही सांगण्यात आलं नसल्याचं सांगत गांगुलीचा दावा खोडून काढला.

First published:
top videos

    Tags: Kl rahul, Rahul dravid, Rohit sharma, South africa, Virat kohli