दक्षिण आफ्रिकेला लोळवलं, टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक

दक्षिण आफ्रिकेला लोळवलं, टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक

शिखर धवन आणि विराट कोहलीची तडाखेबाज अर्धशतकी खेळी आणि गोलंदाजाच्या भेदक माऱ्याने दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा धुव्वा उडवत टीम इंडियाने दिमाखात चॅम्पियन ट्राॅफीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.

  • Share this:

11 जून : शिखर धवन आणि विराट कोहलीची तडाखेबाज अर्धशतकी खेळी आणि गोलंदाजाच्या भेदक माऱ्याने दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा धुव्वा उडवत टीम इंडियाने दिमाखात चॅम्पियन  ट्राॅफीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.भारताने 8 विकेट्स राखत दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवलाय.

चॅम्पियन्स ट्राॅफीच्या सेमीफायनलमध्ये कोण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. दक्षिण आफ्रिकेनं चांगली सुरुवात केली.क्विंटन डी काॅकने 53 रन्स तर हाशीम अमलाने 35 रन्स कर 18 व्या ओव्हरपर्यंत टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेटसाठी संधी दिली नाही. अखेर रविंद्र जडेजाने डी काॅकला आऊट करत ओपनिंग जोडी फोडली.त्यानंतर भुवनेश्वर आणि जसप्रीत बुमराने आफ्रिकेच्या संघाला सुरुंग लावला. दोघांनीही दोन दोन विकेट घेऊन दक्षिण आफ्रिकेला 191 धावांवर रोखलं.

करो या मरोच्या सामन्यात टीम इंडियापुढे 192 धावांचं माफक आव्हान होतं. पण टीम इंडियाची सुरुवात चांगली राहिली नाही. रोहित शर्मा अवघ्या 12 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन विराट कोहली आणि शिखर धवनने टीम इंडियाची कमान सांभाळत विजयाचा पाया भरला. दोघांनी शानदार अर्धशतक झळकावले. पण शिखर धवन 78 रन्स करून आऊट झाला. शिखरने 83 बाॅल्समध्ये 12 चौकार आणि एक सिक्स लगावला. शिखर आऊट झाल्यानंतर युवराज सिंगने टीम इंडियाच्या विजयाची औपचारिक्ता पूर्ण केली. विराटने 102 बाॅल्समध्ये शानदार 76 रन्स केले. यात सात चौकार आणि 1 सिक्सचा समावेश आहे. युवराजने 25 बाॅल्समध्ये 23 रन्स केले. जसप्रित बुमरा मॅन आॅफ द मॅच ठरला.

आता बांगलादेशशी लढत

न्यूझीलंड सारख्या टीमला बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या बांगलादेशसोबत भारताची लढत असणार आहे. पण आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर टीम इंडियाने बांगलादेशला सहज लोळवलंय. त्यामुळे टीम इंडियाचा फायनलचा मार्ग मोकळा असल्याचं मानलं जातंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2017 09:24 PM IST

ताज्या बातम्या