Home /News /sport /

SA vs ENG : विराटच्या सगळ्यात मोठ्या शत्रुचा दमदार कमबॅक, खतरनाक बॉलिंगने केले बॅटचे दोन तुकडे

SA vs ENG : विराटच्या सगळ्यात मोठ्या शत्रुचा दमदार कमबॅक, खतरनाक बॉलिंगने केले बॅटचे दोन तुकडे

37 वर्षीय गोलंदाजाने केली खतरनाक बॉलिंग, चक्क बॅटचे झाले दोन तुकडे!

    केप टाऊन, 07 जानेवारी : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने दुखापतीनंतर पुन्हा क्रिकेटमध्ये कमबॅक केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात महान फलंदाज असलेल्या विराट कोहलीचा सगळ्यात मोठा शत्रु म्हणून अँडरसनची एक वेगळी ओळख आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या कसोटी मालिकेत जेम्स पूर्ण लयीत दिसत आहे. मंगळवारी केपटाऊन कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी 37 वर्षीय अँडरसनच्या वेगवान गोलंदाजीवर चक्क फलंदाजी करणाऱ्या केशव महाराजांची बॅट तुटली. इंग्लंडने केपटाऊन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 438 धावांचे आव्हान ठेवले. चौथ्या दिवशी यजमान पीटर मालनने शानदार अर्धशतक झळकावत संघाला सावरण्याच प्रयत्न केला. अर्धशतकी खेळीनंतर चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने 126-2पर्यंत मजल मारली. वाचा-आज दिग्गज खेळाडूचा करणार कमबॅक, अशी असेल भारताची प्लेयिंग इलेव्हन वाचा-...6,6,6,6,6 KKRच्या खेळाडूने गाजवली बिग बॅश लीग, VIDEO अँडरसनच्या गोलंदाजीनं झाले बॅटचे दोन तुकडे मंगळवारी सामन्याच्या पाचव्या दिवसाची सुरुवात जेम्स अँडरसनने केली. अगदी पहिल्याच चेंडूवर अँडरसनच्या खतरनाक गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू केशव महाराज स्तब्ध झाला. अँडरसनच्या चेंडूवर महाराजने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या बॅटचे दोन तुकडे झाले. हा प्रसंग घडल्यानंतर सर्वजण चकीत झाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात, अँडरसनच्या पाचव्या चेंडूवर 10 व्या षटकात महाराजांची बॅट मोडली. वाचा-अखेर संजू सॅमसनला मिळणार संधी? पंत नाही तर 'या' खेळाडूला विराट बसवणार बाहेर वाचा-गोलंदाजाची बॉलिंग पाहून घाबरला फलंदाज अन् टाकली विकेट, VIDEO VIRAL अँडरसनचा शानदार कमबॅक या मालिकेमध्ये 37 वर्षांचा जेम्स अँडरसन चांगलाच सुरात दिसत आहे. सेंच्युरियन येथे मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट घेतली. अँडरसनने डीन एल्गरला यष्टिरक्षक जोस बटलरच्या मागे झेलबाद केले. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 5 विकेट घेण्याचे आश्चर्यकारक कामगिरी केली. अँडरसनने 19 षटकांची गोलंदाजी करताना 40 धावा देऊन 5 बळी घेतले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket, James anderson, Virat kohli

    पुढील बातम्या