Home /News /sport /

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत संपणार या भारतीय खेळाडूचं करियर, रहाणे-पुजारा नाही तर...

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत संपणार या भारतीय खेळाडूचं करियर, रहाणे-पुजारा नाही तर...

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इशांत शर्माशिवाय (Ishant Sharma) अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या कामगिरीवरही लक्ष असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 3 टेस्ट मॅचच्या सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 डिसेंबर : इशांत शर्मासाठी (Ishant Sharma) 2021 हे वर्ष निराशाजनक राहिलं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीममध्ये (India vs South Africa) इशांतची टीम इंडियात निवड झाली आहे. 33 वर्षांच्या इशांत शर्माने 100 पेक्षा जास्त टेस्ट खेळून 300 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इशांतशिवाय अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या कामगिरीवरही लक्ष असेल. रहाणेला टेस्ट टीमच्या उपकर्णधारपदावरून हटवून निवड समितीने त्यालाही इशारा दिला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 3 टेस्ट मॅचच्या सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये तिन्ही खेळाडू चांगली कामगिरी करून पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. इशांत शर्माची कामगिरी मागच्या काही काळापासून निराशाजनक झाली आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतली सीरिज त्याची अखेरची ठरू शकते, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. 'रहाणेला उपकर्णधारपदावरून हटवणं हा एक इशारा आहे, हीच गोष्ट चेतेश्वर पुजारालाही लागू होते. जर त्याने चांगली कामगिरी केली, तर त्याचं करियर पुढे जाऊ शकतं, पण इशांत शर्मासाठी ही अखेरची सीरिज ठरू शकते,' असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला. इशांत शर्माने मागच्या 12 महिन्यात 8 टेस्टमध्ये 33 च्या सरासरीने फक्त 14 विकेट घेतल्या आहेत, याशिवाय त्याला दुखापतीनेही ग्रासलं आहे. टेस्ट टीममध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) हे दोन उत्कृष्ट बॉलर आहेत. याशिवाय मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि नवदीप सैनीही आपली जागा पक्की करण्यासाठी जोर लावत आहेत. उमरान मलिकनेही आयपीएलमध्ये आपल्या वेगाने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. उमरान मलिक सध्या इंडिया ए सोबत दक्षिण आफ्रिकेमध्येच आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडिया पुढची टेस्ट सीरिज फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारतातच खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये 3 टेस्टची सीरिज खेळवली जाईल. घरच्या सीरिजमध्ये तीन फास्ट बॉलर खेळवणं कठीण आहे, यानंतर टीम इंडिया एक टेस्ट खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही इशांतला एकही विकेट मिळाली नव्हती, यानंतर दुखापतीमुळे तो दुसरी टेस्ट खेळू शकला नव्हता. इशांतने 105 टेस्टमध्ये 311 विकेट घेतल्या आहेत. 74 रन देऊन 7 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india

    पुढील बातम्या