भारतीय संघात संधी नाही, आता दक्षिण आफ्रिकेला मदत करणार 'हा' खेळाडू

भारतीय संघात संधी नाही, आता दक्षिण आफ्रिकेला मदत करणार 'हा' खेळाडू

दक्षिण आफ्रिका टीम इंडियाविरुद्ध आता भारतीय अस्त्राचा वापर कऱणार आहे. यासाठी त्यांनी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अमोल मजूमदार यांची निवड केली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिका संघ भारतीय दौऱ्यावर आला आहे. या संघाला एक भारतीय खेळाडूच फलंदाजीचे प्रशिक्षण देणार आहे. रणजी ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडणारा माजी फलंदाज अमोल मजूमदार यांची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत चांगल्या कामगिरीसाठी दक्षिण आफ्रिकेनं अमोल मजूमदार यांच्याकडं फलंदाजी प्रशिक्षकपदाची धूरा सोपवली आहे.

मजूमदार यांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक कॉरी वेन जिल यांनी सांगितलं की, अमोल मजूमदार यांना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. आमच्या फलंदाजांना येणाऱ्या अडचणींचा, आव्हानांचा सामना कसा करायचा यासाठी ते चांगलं तयार करू शकतील. त्यांनी अॅडन मार्करम, टेंबा बावुमा आणि जुबेर हमजा यांना फिरकी गोलंदाजी कशी खेळायची याचं प्रशिक्षण दिलं आहे.

दक्षिण आफ्रिकेनं अमोल मजूमदार यांची घरेलू क्रिकेटमधील कामगिरी पाहून त्यांना फलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्त करण्यात आलं आहे. मजूमदार यांनी मुंबईकडून खेळताना त्यांनी प्रथम श्रेणीत 11 हजार 167 धावा केल्या होत्या. रणजीमध्ये सर्वाधिक धावा करण्यामध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 2014 मध्ये निवृत्ती घेतली होती.

अमोल मजूमदार यांच्याकडं बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं हाय परफॉर्मन्स कोचिंग सर्टीफिकेट आहे. त्यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षण दिलं होतं. तसंच नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी अंडर 19 आणि अंडर 23 संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. डिसेंबर 2013 मध्ये नेदरलँडच्या संघाचं प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर अमोल मजूमदार यांनी म्हटलं की, 25 वर्ष खेळाडू म्हणून मैदानावर खेळल्यानंतर आता पुढचे 25 वर्ष प्रशिक्षक म्हणून काम करायचं आहे. चांगल्या आणि प्रतिभावान खेळांडूना तयार करायचं आहे. माझ्या या नव्या प्रवासासाठी उत्सुक आहे असंही ते म्हणाले.

VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा, इतर टॉप 18 बातम्या

First published: September 10, 2019, 9:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading