विराटच्या विक्रमांवर हमला करणारा हाशिम अमला, रनमशिनसमोर या कामगिरीचं आव्हान!

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलानं एका पाठोपाठ विराटचे विक्रम मोडले होते. दोघांमध्ये शतकांची शर्यतही लागली होती.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 11:48 AM IST

विराटच्या विक्रमांवर हमला करणारा हाशिम अमला, रनमशिनसमोर या कामगिरीचं आव्हान!

मुंबई, 10 ऑगस्ट : दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज हाशिम अमलानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गेल्या चार-पाच वर्षांत अमला आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यात शतकांची शर्यत लागली होती. यात कोहलीनं अमलाला मागे टाकलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अमला 28 शतकांवरच थांबवा तर कोहलीनं 41 शतकांपर्यंत मजल मारली आहे. त्यानंतर दोघांमधील स्पर्धेची चर्चा थांबली. तरीही हाशिम अमलाच्या काही विक्रमांपासून विराट थोडा दूर राहिला.

अमलाने केलेले विक्रम नव्या खेळाडूंसाठी एक आव्हान असेल. अमलाची फलंदाजीची शैली पाहता त्यानं ही कामगिरी केली यावर विश्वास बसणार नाही. भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागलासुद्धा ही कामहिरी करता आली नव्हती. भारताचे रनमशिन विराट कोहलीला आमलाचे काही विक्रम मोडता आले नाहीत.

सर्वात वेगवान 2000 धावा करण्याचा विक्रम अमलाच्या नावावर आहे. त्यानं फक्त 40 डावात ही कामगिरी केली होती. तर कोहलीनं ही कामगिरी 53 डावात केली होती. त्यानंतर 3000 ते 7000 धावांचा टप्पाही वेगानं पार करण्याचा विक्रम अमलाच्याच नावावर आहे. त्यानं 150 डावात अमलानं 7 हजार धावा केल्या होत्या. तर विराटनं 161 डावात हा टप्पा गाठला होता.

कसोटीत अमलानं त्रिशतक साजरं केलं आहे. विराटला मात्र ही कामगिरी करता आलेली नाही. विराट आणि अमला दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं समान डावात केली आहेत. दोघांनीही 50 वं शतक 348 व्या डावात केलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांत विराटची धावांची भूक वाढली आणि अमला मागे पडला.

VIDEO: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने बोलावलेल्या बैठकीत काय म्हणाले शरद पवार?

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 11:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...