दक्षिण आफ्रिकेनं रोखला भारताचा विजयरथ!

दक्षिण आफ्रिकेनं रोखला भारताचा विजयरथ!

या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं स्पर्धेतील आव्हान राखलेच, तर ही लढत जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचं भारताचं स्वप्न भंगलं.

  • Share this:

09 जुलै: अत्यंत दमदार सुरूवात करणाऱ्या भारतीय महिला संघाला वर्ल्ड कपमध्ये पहिल्या पराभवास सामोरं जावं लागलं. राउंड रॉबिनमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताची वर्ल्डकपमधील विजयी घोडदौड दक्षिण आफ्रिकेने शनिवारी रोखली.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २७३ धावा केल्या.जेव्हा की भारतीय संघाची अवस्था 6बाद 56 अशी झाली. दिप्ती शर्माच्या 60 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघानं शंभरी तर ओलांडली पण लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय महिलांना दक्षिण आफ्रिकेनं ४६ षटकांत १५८ धावांतच गुंडाळलं. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं स्पर्धेतील आव्हान राखलंच, तर ही लढत जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचं भारताचं स्वप्न भंगलं. अष्टपैलू कामगिरी करणारी कॅप्टन डॅन व्हॅन निकेर्क सामन्याची मानकरी ठरली.

आता उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला आॅस्ट्रेलिया आणि न्युझिलंडचा सामना करावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2017 09:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading