'नाणेफेक बंद करा, आम्हाला अंधारात खेळवलं', भारताविरुद्ध पराभवानंतर डुप्लेसी चिडला

'नाणेफेक बंद करा, आम्हाला अंधारात खेळवलं', भारताविरुद्ध पराभवानंतर डुप्लेसी चिडला

भारताने दक्षिण आफ्रिकेला तीनही कसोटीत पराभूत करून व्हाइट वॉश दिला होता.

  • Share this:

जोहान्सबर्ग, 27 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने तीन कसोटीची मालिका 3-0 ने जिंकली. भारताने शेवटच्या दोन कसोटीमध्ये एका डावाने विजय मिळवला. या पराभवानंतर आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीने कसोटीमध्ये नाणेफेक बंद करायला हवी असं म्हटलं आहे. संघात आत्मविश्वास कमी होता. तीन सामन्यात नाणेफेक हारल्यानं कठीण काम अशक्य झालं असं डुप्लेसी म्हणाला.

भारताने शेवटच्या दोन कसोटीत आफ्रिकेला एक डाव आणि शंभरपेक्षा जास्त धावांनी पराभूत केलं. डुप्लेसी म्हणाला की, भारताना पहिल्यांदा फलंदाजी केली आणि 500 धावा केल्या. त्यांनी दिवसभर खेळून अंधार पडल्यावर डाव घोषित केला आणि त्यानंतर आमच्या तीन विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत तिसऱ्या दिवशी तुमच्यावर दबाव राहतो. प्रत्येक कसोटी कॉपी-पेस्ट झाली असंही डुप्लेसीने म्हटलं.

नाणेफेकीत नशीब अजमावण्यासाठी तात्पुरत्या कर्णधाराला घेऊन डुप्लेसी तिसऱ्या कसोटीत उतरला होता. तरीही त्याला अपयश आलं. त्याबद्दल डुप्लेसी म्हणाला की, नाणेफेक बंद केल्यास संघांना परदेशात चांगल्या पद्धतीने खेळण्याची संधी मिळेल. आम्ही ज्या पद्धतीने शेवटच्या कसोटीत खेळलो त्यानुसार हे नक्कीच दिसत होतं की, आम्ही चांगली सुरुवात केली. पण मालिकेत बराच काळ दबावाखाली खेळल्याने आमची कामगिरी खराब झाली.

दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ

कर्णधार विराट कोहली पहिला कर्णधार ठरला आहे, ज्यानं दक्षिण आफ्रिका संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. याआधी कोणत्याच कर्णधाराला असा पराक्रम करता आला नाही आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका विरोधात एकपेक्षा जास्त मालिका जिंकण्याची कामगिरी करणारा विराट पहिला कर्णधार ठरला आहे. याधी सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरनं 1-1 मालिका जिंकल्या आहेत.

सगळ्यात जास्त धावांनी जिंकला सामना

याआधी सर्वात जास्त धावा आणि डावांनी सामना जिंकण्याची कामगिरी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. या विक्रमाची आता विराटनं बरोबरी केली आहे. विराटनं तब्बल नव्यांदा एका डावानं विजय मिळवला. याआधी मोहम्मद अझरुद्दीननं 8व्यांदा तर गांगुलीनं 7व्यांदा ही कामगिरी केली होती.

दक्षिण आफ्रिका विरोधात सर्वात जास्त कसोटी विजय

भारतीय संघाकडून सर्वा जास्त कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली पहिली खेळाडू ठरला आहे. तर, जगातला दुसरा कर्णधार आहे, ज्यानं दक्षिण आफ्रिकेला 7 सामन्यात पराभूत केले आहे. विराटच्या आधी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंग याचा क्रमांक लागतो. पॉटिंगनं कर्णधार म्हणून 8वेळा सामना जिंकण्याची कामगिरी केली आहे.

VIDEO : अमरावतीमध्ये तुफान राडा, रवी राणा-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमनेसामने

First published: October 27, 2019, 9:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading