अरे देवा! NUDE होऊन पळतोय आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू, VIDEO पाहूनच कळेल कारण

अरे देवा! NUDE होऊन पळतोय आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू, VIDEO पाहूनच कळेल कारण

सेल्फ क्वारंटाइनमध्ये असलेल्या आफ्रिकेच्या खेळाडूंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

केप टाऊन, 20 मार्च : भारत-दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मायदेशी परतले आहेत. दरम्यान कोरोनामुळे त्यांना सेल्फ क्वारंटाइनमध्ये काही काळ ठेवण्यात आले आहे. असे असताना आफ्रिकेचे खेळाडू अर्धनग्न होऊन पळतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खेळाडूंच्या अशा पळण्यामागे काय कारण असावे, असा प्रश्व चाहत्यांना पडला आहे.

खेळाडूंमधील संबंध चांगले ठेवण्यासाठी आणि वातावरण सकारात्मक करण्यासाठी आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या वतीने धावण्याची एक अजब स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात दोन गटांमध्ये खेळाडू धावताना दिसत आहेत. एका गटात अंडेले फेहलूकवायो, लुंगी अॅगिडी आणि रासी व्हॅन डरड्युसेन तर दुसऱ्या गटात कर्णधार फाफ ड्युप्लेसिस पळताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओमध्ये ड्युप्लेसिस आपली पॅंट खाली करूनही दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी ड्युप्लेसिसला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा-VIDEO : बेन स्टोक्सच्या तोंडावर पत्नीनं मारलं पाणी, पाहा पुढे काय झालं

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

When you find out you’re back in play 😅💪🇿🇦 #InterSquadCompetition #tourdiaries #incredibleindia #WhileWeWaitToGoHome

A post shared by Cricket South Africa (@cricket_south_africa) on

वाचा-क्रिकेटपटू स्वप्नात पत्नीला देतो शिव्या, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

याआधी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. मात्र कोरोनामुळे दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर आफ्रिकेचा संघ मंगळवारी मायदेशी परतला. आता आफ्रिकेच्या संघाला खबरदारी म्हणून पुढच्या 14 दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं आहे.

वाचा-VIDEO : श्रेयस अय्यर आणि पांड्याचा सेल्फीसाठी जुगाड, केएल राहुलने दिला सल्ला

भारत-आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. 12 तारखेला धर्मशाळा इथं हा सामना होता मात्र पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतरचे उर्वरित दोन सामने लखनऊ आणि कोलकाता इथं होणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकाच रद्द करण्यात आली.

First published: March 20, 2020, 11:26 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या