मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सौरव गांगुलीचा रुग्णालयातला मुक्काम एक दिवसाने वाढला, जाणून घ्या कारण

सौरव गांगुलीचा रुग्णालयातला मुक्काम एक दिवसाने वाढला, जाणून घ्या कारण

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा रुग्णालयातला मुक्काम आणखी एका दिवसाने वाढला आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा रुग्णालयातला मुक्काम आणखी एका दिवसाने वाढला आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा रुग्णालयातला मुक्काम आणखी एका दिवसाने वाढला आहे.

कोलकाता, 6 जानेवारी : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा रुग्णालयातला मुक्काम आणखी एका दिवसाने वाढला आहे. कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार गांगुलीला आज रुग्णालयातच राहायचं आहे, त्यामुळे तो उद्या घरी जाईल. गांगुलीची तब्येत सध्या स्थिर असून तो फिट आहे. याआधी त्याला बुधवारी डिस्चार्ज मिळेल, असं रुग्णालयाने सांगितलं होतं.

वूडलॅन्ड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉक्टर रुपाली बासू म्हणाल्या, 'सौरव गांगुलीला रुग्णालयातून सोडल्यानंतर घरीच त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल.' गांगुलीला मागच्या आठवड्यात हृदयविकाराचा झटका आला होता, यानंतर त्याच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली होती. शनिवारी गांगुलीच्या रिपोर्टमध्ये हृदयाशी संबंधित ट्रिपल वेसेल डिसिज असल्याचं निष्पन्न झालं. गांगुलीच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाले होते. त्याची दुसरी एन्जियोप्लास्टी नंतर होण्याची शक्यता आहे.

लोकप्रिय हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर देवी शेट्टी यांनी गांगुलीवर उपचार करणाऱ्या 13 डॉक्टरांच्या टीमची भेट घेतली. या डॉक्टरांना भेटल्यावर शेट्टी म्हणाले, 'गांगुली लवकरच फिट होईल आणि त्याचं हृदय 20 वर्षांचा असतान जसं होतं, तसंच चालेल. गांगुलीच्या हृदयाला कोणताही धोका नाही. भविष्यातही या दुखण्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तो सामान्य आयुष्य जगू शकतो आणि व्यायामही करू शकतो.'

सौरव गांगुलीला पुन्हा एन्जियोप्लास्टीची गरज आहे का? असा प्रश्न डॉक्टरांना विचारण्यात आला, तेव्हा हे सगळं सौरव गांगुलीवर अवलंबून आहे. गोळ्या घेऊनही त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतात, पण एन्जियोप्लास्टी करणं योग्य राहिल. याचा निर्णय त्याला घ्यायचा आहे, पण त्याने दोन आठवडे थांबावं आणि मग ठरवावं, असं मत डॉक्डरांनी मांडलं.

First published: