फक्त 10 महिन्यांसाठीच गांगुली BCCI च्या अध्यक्षपदी?

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची BCCI च्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. निवड झाल्यानंतर जास्तीजास्त 3 वर्षे एखादी व्यक्ती त्या पदावर राहू शकते.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 10:44 AM IST

फक्त 10 महिन्यांसाठीच गांगुली BCCI च्या अध्यक्षपदी?

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI)च्या अध्यक्षपदी  निवड जवळपास निश्चित झाली आहे. सध्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत बृजेश पटेल आणि गांगुली यांच्यात स्पर्धा आहे. कोणाला अध्य़क्ष करायचं यावरून दोन गट निर्माण झाले होते. पण गांगुलीच्या नावावर सर्वांची सहमती असल्याची माहिती आहे. याबद्दल अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर कऱण्यात आलेला नाही.

मैदानात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेला 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन(CAB)चा अध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीचं नाव जवळपास निश्चित झालं असलं तरी तो फक्त 10 महिनेच या पदावर राहू शकतो.  त्यामुळे तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल. नुकतीच सौरव गांगुलीची सीएबीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यामुळे गांगुलीला बीसीसीआयच्या नव्या संविधानानुसार कूलिंग ऑफ पीरियडमध्ये जावं लागेल. त्याला पुढच्या तीन वर्षांपर्यंत बीसीसीआयचं कोणंतही पद भूषवता येणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी गांगुली आणि पटेल यांच्या नावाची चर्चा होती. अध्यक्ष कोणाला करावे यासाठी सुरुवातीला मतभेद होते. यात अनुराग ठाकूर आणि एन.श्रीनिवासन असे दोन गट पडले होते. पण नंतर या दोन्ही गटांचे गांगुलीच्या नावावर एकमत झाले. यासंदर्भात मुंबईत रविवारी रात्री एन.श्रीनिवासन, अनुराग ठाकूर आणि राजीव शुक्ला यांची सर्व राज्यातील प्रतिनिधींशी बैठक झाली.

अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज (सोमवारी) नामांकन दाखल केले जाणार आहे. पण यासाठी कोणतीही निवडणूक होणार नाही. आयपीएलचे चेअरमन आणि उपाध्यक्षपदासाठी देखील शोध सुरु आहे. पण खरी लढत बीसीसाआयच्या अध्यक्षपदासाठी गांगुली आणि बृजेश यांच्यात असल्याचे समजते.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा सचिव तर अरुण धुमल कोषाध्यक्ष होतील. अरुण धुमल हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू आहेत.तर आसामचे देबाजीत सैकिया हे संयुक्त सचिव होण्याची शक्यता आहे. सैकिया यांची निवड झाली तर बीसीसीआयमध्ये ईशान्येकडील व्यक्तीला प्रथमच इतके मोठे पद मिळेल.

Loading...

गांगुलीची अध्यक्षपदी निवड झाली तर कर्नाटचे बृजेश पटेल यांची आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते. बीसीसीआयच्या अपेक्स काऊंसिलमध्ये 9 सदस्य आहेत. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, संयुक्त सचिव, क्रिकेटर्स असोसिएशनचा एक पुरुष प्रतिनिधी, एक महिला प्रतिनिधी, आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचा एक प्रतिनिधी आणि केंद्र सरकारचा एक प्रतिनिधी यांचा समावेश असतो.

क्रिकेटर्स असोसिएशनचे पुरुष प्रतिनिधी म्हणून अंशुमान गायकवाड असतील. यासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी कीर्ती आझाद यांचा 471 मतांनी पराभव केला. तर महिला प्रतिनिधी म्हणून माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांची सर्वसहमतीने निवड करण्यात आली आहे.

वाचा : थरूरांचं भारतीय क्रिकेटपटूवरचं ट्विट चर्चेत, नाराज झालेला श्रीसंत म्हणाला...

दोन राजकीय पैलवानांची कथा, शरद पवार मुख्यमंत्र्यांना चितपट करणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...