मुंबई, 19 डिसेंबर : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या मुलीची नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर एक पोस्ट व्हायरल होत होती. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी हिंसाचार झाला होता. त्यानंतर गांगुलीची मुलगी सना हिची एक इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली होती.
आता सौरव गांगुलीने स्वत: त्या पोस्टवर स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला की संबंधित पोस्ट खोटी आहे. सनाला अशा मुद्यांपासून दूर ठेवण्याचं आवाहनही त्याने केलं आहे. राजकारणाबद्दल समज यायला ती अजुन खूप लहान आहे असंही गांगुलीने म्हटलं.
Please keep Sana out of all this issues .. this post is not true .. she is too young a girl to know about anything in politics
— Sourav Ganguly (@SGanguly99) December 18, 2019
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये सनाने लेखक खुशवंत सिंग यांच्या द एंड ऑफ इंडिया या पुस्तकातील एका पानाचा फोटो पोस्ट केला होता. देशातील सध्याच्या वातावरणावरून निशाणा साधला असल्याचंच त्यातून दिसत होतं. तसेच विरोधही केला होता. त्यात म्हटलं होतं की, ज्यांना असं वाटतं की ते मुस्लिम नाहीत म्हणून सुरक्षित आहेत ते मुर्खांच्या दुनियेत जगत आहेत.
BCCI President @SGanguly99's daughter Sana Ganguly just won my heart by this post. Incredible maturity from an 18 year old. pic.twitter.com/wQN5eyfY6G
— Aparna (@chhuti_is) December 17, 2019
सनाच्या इन्स्टाग्रामवर अशी पोस्ट दिसत नसली तरी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट मात्र व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अखेर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने ती पोस्ट खोटी असल्याचे सांगत मुलीला अशा मुद्यापासून दूर ठेवण्याची विनंती केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sourav ganguly