नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मंगळवारी एक मोठी चूक केली. गांगुलीने एका दिवंगत मुख्यमंत्र्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर चाहत्यांनी गांगुलीला ट्रोल केलं. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी बन्सी लाल यांच्या जयंतीनिमित्त एका ट्विटर युजरनं हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कुशल प्रशासक बन्सी लाल चौधरी यांना जयंतीनिमित्त अभिवादन आणि श्रद्धांजली असे ट्विट केलं होतं.
युजरने केलेल्या ट्विटवर कमेंट करताना गांगुलीने दिवंगत माजी मुख्यमंत्री बन्सी लाल चौधरी यांच्या चांगल्या आऱोग्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर गांगुलीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
एका चाहत्यानं म्हटलं आहे की, गांगुली ब्रेट लीच्या बाऊन्सरसारखा खेळला. तर एका चाहत्यानं म्हटलं आहे की, ज्या बन्सी लाल यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहात त्यांचं निधन 2006 मध्ये झालं आहे.
दरम्यान गांगुलीनं यापुढे हरियाणाच्या प्रकरणात वीरेंद्र सेहवागचा सल्ला घ्यावा असं एका युजरनं म्हटलं आहे. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर गांगुलीनं ट्विट डीलीट केलं.
#Respects & Homage to former #Haryana CM & great Administrator Ch Bansi Lal on his birth anniversary. #HaryanaKaLaal pic.twitter.com/Tp2Ahn4XKZ
— Haryana Tweets ✏️ (@HaryanaTweets) August 26, 2019
चौधरी बन्सी लाल यांचं निधन 28 मार्च 2006 मध्ये झालं होतं. त्यांनी 1968, 1972, 1986 आणि 1996 मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. बन्सीलाल 1975 ते 1977 या काळात सुरक्षा मंत्रीसुद्धा होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sourav ganguly, Virender sehwag