ना कोच, ना निवड समितीचा अध्यक्ष; 'ही' आहे सौरव गांगुलीची सेकंड इनिंग!

ना कोच, ना निवड समितीचा अध्यक्ष; 'ही' आहे सौरव गांगुलीची सेकंड इनिंग!

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर छोट्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे.

  • Share this:

कोलकाता, 18 ऑगस्ट : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर छोट्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. गांगुली बंगाली मालिका बोकुल कोठा या कार्यक्रमात एका छोट्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. सोशल मीडियावर गांगुलीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुल-मुलींचा घोळका दादाला, सामना कसा जिंकू शकतो, असे प्रश्न विचारतात. यावर गांगुलीनं, “आपल्या क्षमनेनुसार खेळा. शेवटच्या चेंडूपर्यंत लढा”, असा कानमंत्र दिला.

दरम्यान या कार्यक्रमाची प्रमुख अभिनेत्री उशाषी रॉय यांनी, गांगुलसोबत काम करताना आनंद झाला असे मत एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. उशाषी यांनी गांगुलीचे कौतुक करताना, “मी सांगू नाही शकत दादा किती चांगले आहेत. सुरुवातीला थोडं दडपण होतं, पण ते खुपच मन मिळावू आहे. त्यांनी मला घर, माझा अभ्यास यासंबंधातही विचारले, त्यामुळं नंतर मला कसलेही दडपण नव्हते”, असे सांगितले.

सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रमुख आहे. त्याचबरोबर आयसीसीच्या स्पर्धांमध्ये समालोचक म्हणूनही तो काम पाहतो. भारतीय संघाकडून गांगुली 49 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 21 सामन्यात विजय तर 13 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तर दादाच्या नेतृत्वाखाली 1999 ते 2005मध्ये भारतानं 146 एकदिवसीय सामने खेळले. त्यापैकी 76 सामन्याच विजय तर 65 सामन्यात पराभवाचा फटका बसला.

वाचा-श्रीलंकेचा संघ पाकमध्ये खेळून पुन्हा स्वत:चा जीव टाकणार धोक्यात?

वाचा-धोनी-गांगुलीनं केलेली चूक करतोय विराट, भारताला बसणार फटका?

गांगुलीनं 113 कसोटी सामन्यात 7, 212 धावा केल्या आहेत. तर, 311 एकदिवसीय सामन्यात 22 शतकांच्या जोरावर 11 हजार 363 धावा केल्या आहेत.

वाचा-अखेर रवी शास्त्रींनी सोडवला चौथ्या क्रमांकाचा तिढा, 'या' खेळाडूचं नाव फिक्स!

SPECIAL REPORT: समुद्र किनारी रेतीतच रंगला 'कुस्तीचा फड', नारळी पौर्णिमेची अलिबागमध्ये धूम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या