धोनीच्या निवृत्तीवरून गांगुलीनं भारतीय संघाला दिला सल्ला!

धोनीच्या निवृत्तीवरून गांगुलीनं भारतीय संघाला दिला सल्ला!

वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्त घेणार अशी चर्चा रंगली होती. त्याच्या निवृत्तीवरून अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी आतापर्यंत मत व्यक्त केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीच्या निवृत्तीवरून टीम इंडियाला संघाला दिला आहे. धोनीशिवाय खेळण्याची सवय आता संघाला लावून घ्यायला हवी. दोन वेळा विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला कायम खेळत राहता येणार नाही. गांगुलीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, धोनी जास्त काळ खेळणार नाही याची जाणीव संघाला हवी. निवृत्तीचा निर्णय धोनीलाच घ्यायचा आहे.

प्रत्येक मोठ्या खेळाडूला निवृत्ती घ्यायची असते. हा खेळ आहे. तेंडुलकर, लारा, ब्रॅडमन या सर्वांना निवृत्ती घ्यावी लागली. धोनीसमोरही ही वेळ आली आहे असं गांगुलीने म्हटलं आहे. धोनीनं गांगुलीच्या नेतृत्वाखालीच 2004 मध्ये पदार्पण केलं होतं. चार वर्षांनी गांगुलीने धोनी कर्णधार असताना शेवटची कसोटी खेळली. दरम्यान धोनीने शेवटच्या सामन्यात गांगुलीनं नेतृत्व करावं असं म्हटलं होतं.

गांगुली म्हणाला की, धोनीला आता त्याच्या खेळीची समीक्षा करायला हवी. त्यानं विचार केला पाहिजे की तो भारताला सामना जिंकून देऊ शकतो का? तो एमएस धोनीसारखी कामगिरी करू शकतो का हे पाहिलं पाहिजे.

निवृत्तीचा निर्णय धोनीचा असून त्याच्यासारख्या खेळाडूला माहिती आहे कधी निवृत्त व्हायचं. पुढे काय होणार हे सर्व आता निवड समितीच्या हातात आहे असंही गांगुली म्हणाला.

टीम इंडियाची निवड समिती आणि संघ व्यवस्थापनानं 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीवर विश्वास दाखवला होता. भारताला वर्ल्ड कपमध्ये अपयश आल्यानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीवर निवड समितीनं हा त्याचा निर्णय असेल असं म्हणत अजुनही धोनी संघासोबत असेल त्याची संघाला गरज आहे असं म्हटलं होतं.

ट्रम्प यांनी घेतली फिरकी, मोदींनी दिली सॉलिड टाळी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 07:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading