ऋषभ पंतमध्ये धोनीसारखा दम नाही, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ

पंतला वेस्ट इंडिज दौऱ्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळं त्याच्यावर टीका होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 10:21 PM IST

ऋषभ पंतमध्ये धोनीसारखा दम नाही, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं दक्षिण आफ्रिकेविरोधात निवडलेल्या भारतीय संघावर समाधान व्यक्त केले आहे. टी-20 सामन्यात महेंद्रसिंग धोनीला संघात जागा न घेण्याबाबतही गांगुलीनं यावेळी समर्थन केले. तसेच, ऋषभ पंतची निवड योग्य असल्याचे मत व्यक्त केले. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आपल्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरोधात भिडणार आहे. 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान या दौऱ्यासाठी 29 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची निवड करण्यात आली.

तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यात महेंद्रसिंग धोनी, जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच, वेस्ट इंडिज दौऱ्यात विश्रांती देण्यात आलेल्या हार्दिक पांड्याला संघात स्थान दिले आहे. यावेळी गांगुलीनं संघा निवडीवर भाष्य केले.

एका कार्यक्रमात गांगुलीनं, “मला नव्हते वाटतं की दक्षिण आफ्रिकेविरोधात धोनीची निवड झाली असती. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या टी-20 मालिकेतच संकेत मिळाले होते की पंतला संघात जागा मिळायला हवी. कारण जेव्हा धोनी युवा खेळाडू होता, तेव्हा त्याला संधी देण्यात आली होती”, असे मत व्यक्त केले.

या धर्तीवर झाली संघाची निवड

आफ्रिकेविरोधात भारतीय संघाची 2020 टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टिकोणातून निवड झाली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळं या संघात खेळाडूंची निवड करताना टी-20 वर्ल्ड कपचा निकष समोर ठेवला आहे. त्यामुळं धोनीला संघात जागा दिलेली नाही. भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2020आधी 22 टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळं ची-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे.

Loading...

वाचा-दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला पंत, VIDEO पाहून तुम्ही लावाल डोक्याला हात

पंतची तुलना धोनीशी होऊच शकत नाही

यावेळी गांगुलीनं पंतची तुलना धोनीसोबत होऊच शकत नाही असे सांगत. “पंत धोनी सारखा नाही आहे, किंवा येत्या तीन-चार वर्षातही असे होणार नाहीत. धोनीला एमएस धोनी होण्यासाठी तब्बल 15 वर्षांचा कालावधी लागला. भारतीय संघासाठी पंत खास आहे”, असे मत व्यक्त केले.

वाचा-भारताच्या स्टार खेळाडूनं सोडला देश, आता इंग्लंडमधून खेळणार क्रिकेट!

विराटची भुमिका महत्त्वाची

तसेच, यावेळी गांगुलीनं विराटची भुमिका महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त करत. “धोनीला काय सांगायचे आहे, ही विराटची जबाबदारी आहे. हे सांगणे कठिण आहे पण धोनीकडून काय अपेक्षा करायच्या आहेत ही विराटची भुमिका आहे”, असे मत व्यक्त केले. तसेच, धोनीच्या निवृत्तीवर बोलताना, प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असे क्षण येतात. माराडोना, तेंडुलकर आणि आता धोनी सगळ्यांच्या बाबतीत असे घडले आहे”, असे सांगितले.

3 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दिपक चहर, नवदीप सैनी.

वाचा-‘हातात ग्लोव्हज घालून विकेटकिपर होत नाही’, माजी खेळाडूची ऋषभ पंतवर जहरी टीका

SPECIAL REPORT : स्फोटात बॉयलरचा तुकडा शेतमजूर महिलेवर पडला, शिरपूरमधील भयावह दृश्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Aug 31, 2019 10:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...