‘हा प्रश्न मोदी आणि इमरान यांना विचारा’, गांगुलीच्या वक्तव्यानं खळबळ

‘हा प्रश्न मोदी आणि इमरान यांना विचारा’, गांगुलीच्या वक्तव्यानं खळबळ

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या गांगुलीचे धक्कादायक व्यक्तव्य.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याआधी सध्या सगळीकडेच सौरव गांगुलीची चर्चा आहे. याआधी गांगुलीनं धोनीच्या निवृत्तीवर आणि भारताच्या भविष्यावर भाष्य केले होते. मात्र गांगुलीकडे एका प्रश्नाचे उत्तर अद्याप नाही आहे.

भारताचा माजी कर्णधार 19 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीनंतर अध्यक्षपदाचा पदभार सांभाळेल. मात्र त्याआधीच गांगुलीनं महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान गांगुलीला भारत-पाक सामना कधी होणार असे विचारले असल्यास त्यानं अजब उत्तर दिले. गांगुलीनं, “या सगळ्या प्रश्नांचे उत्तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान यांना विचारा”, असे सांगितले. दरम्यान भारत-पाक हे दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये खेळतात. दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये सामने खेळले आहेत. 26/11नंतर भारत-पाकमध्ये एकही सामना झालेला नाही.

वाचा-विराटची चिंता वाढली! गांगुलीनं काढले कोहली विरोधात फर्मान

त्यामुळं गांगुलीनं हा प्रश्न सुरक्षितरित्या टोलावला. गांगुलीनं “भारत आणि पाक यांच्यातील सामन्याचा निर्णय हा नरेंद्र मोदी आणि इमरान खान यांच्या संमतीनं घेतला जाईल. हा निर्णय देशाचा आहे बीसीसीआयचा नाही”, असे सांगितले.भारत-पाकिस्तान यांच्यात 2012मध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. दरम्यान याआधी 2004मध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारतानं कसोटी मालिका 2-1नं तर एकदिवसीय मालिका 3-2नं जिंकली होती. 1999मध्ये भारत-पाकमध्ये झालेल्या कारगिल युध्दानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ पाक दौऱ्यावर गेला होता.

वाचा-धोनीबाबत काय घेणार निर्णय? गांगुली म्हणाला त्याला विचारणार की...

वर्ल्ड कप टी-20च्या सराव सामन्यात भिडणार भारत-पाक

दरम्यान, आता पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपआधी भारत-पाकमध्ये सराव सामना होऊ शकतो. कारण आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ वेगवेगळ्या गटांमध्ये आहेत. त्यामुळं आयसीसीच्या वतीनं चाहत्यांसाठी भारत-पाक यांच्यात सराव सामना आयोजित करण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धांमध्ये 2012पासून एका ग्रुपमध्ये राहिले नाही आहेत. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 क्रिकेट वर्ल्ड कप रॉबीन राऊंड पध्दतीनं खेळले गेले. याआधी 2009 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकमध्ये सराव सामना झाला होता. अद्याप यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक सराव सामन्यासाठी बीसीसीआयनं परवानगी दिलेली नाही.

वाचा-‘गांगुली होता म्हणून भारतानं पाकिस्तानला नमवलं’, माजी क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट

VIDEO : 'देवेंद्र फडणवीस ठरवणार उपमुख्यमंत्री', पाहा काय म्हणाले अमित शाह

First published: October 17, 2019, 3:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading