मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Hardik Pandyaचा टीम इंडियातून पत्ता कट, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलींनी सांगितले कारण

Hardik Pandyaचा टीम इंडियातून पत्ता कट, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलींनी सांगितले कारण

Hardik Pandya

Hardik Pandya

हार्दिक पांड्याला (Hardik Pandya)न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी(IND vs NZ) संघातून वगळण्यात आले.

नवी दिल्ली, 1 डिसेंबर: टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup 2021) संपल्यापासून हार्दिक पांड्या(Hardik Pandya) संघाबाहेर आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये पांड्याने निराशजनक कामगिरी केली. तो केवळ दोनच वेळा गोलंदाजी करु शकला आणि आणि दोन्ही वेळा रिकाम्या हाताने परतला. टूर्नामेंट संपल्यानंतर हार्दिक पांड्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. की, खराब कामगिरीमुळे त्याला वगळण्यात आले आहे. अशी चर्चा क्रिकेट जगतात सुरु असतानाच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली(Sourav Ganguly) पांड्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

पांड्या हा चांगला क्रिकेटपटू असून तो तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आल्याचे गांगुली यांनी सांगितले. खरतर, पाठीच्या समस्येमुळे 2019 मध्ये शस्त्रक्रियेनंतर पांड्या भारत आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी गोलंदाजी करू शकला नाही. शेवटच्या वेळी त्याने 2019 मध्ये आयपीएलमध्ये गोलंदाजी केली होती.

दुखापतीतून सावरल्यानंतर पांड्या पुनरागमन करेल

पांड्या खराब कामगिरीमुळे संघाबाहेर नसून तंदुरुस्तीमुळे असल्याचे गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त होताच त्याला संघात पुन्हा स्थान मिळेल. गांगुली म्हणाले , तो चांगला क्रिकेटर आहे. तो तंदुरुस्त नाही, त्यामुळे तो संघात नाही. तो तरुण आहे, दुखापतीतून सावरल्यानंतर तो पुनरागमन करेल अशी आशादेखील त्यांनी यावेळ व्यक्त केली.

अलीकडेच, अशी बातमी आली होती की, हार्दिक पांड्याला यावेळी त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्यासाठी त्याने राष्ट्रीय निवडकर्त्यांना काही काळ त्याच्या नावाचा विचार करू नये, कारण तो पूर्णपणे फिटनेसची काळजी घेत आहे. साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

First published:
top videos

    Tags: Hardik pandya, Sourav ganguly