मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final नंतर गांगुलीची पहिली प्रतिक्रिया, विराटला म्हणाला...

WTC Final नंतर गांगुलीची पहिली प्रतिक्रिया, विराटला म्हणाला...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या फॉरमॅटवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या फॉरमॅटवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भविष्यात एका टेस्ट मॅचमधून चॅम्पियन ठरवण्यापेक्षा बेस्ट ऑफ थ्री फॉरमॅट खेळवण्यात यावा, असं मत विराटने मांडलं होतं. मॅचच्या निकालामुळे आम्ही जास्त चिंतेत नाही, कारण एका मॅचमधून बेस्ट टीमची निवड होता कामा नये, यासाठी 3 टेस्ट मॅचची सीरिज खेळवली गेली पाहिजे होती, असं विराट म्हणाला.

विराटशिवाय सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही बेस्ट ऑफ थ्री माध्यमातून फायनलचा निकाल लागायला पाहिजे होता, अशा प्रतिक्रिया दिल्या. या मुद्द्यावर आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही (Sourav Ganguly) त्याचं मत मांडलं आहे. जसा मोसम पुढे जाईल, तसं आयसीसी (ICC) या गोष्टीबाबत विचार करेल, सध्या याबाबत काहीही बोलणं घाईचं होईल. थोडा वेळ वाट पाहावी लागेल, असं वक्तव्य गांगुलीने द वीकसोबत बोलताना केलं.

गांगुलीला स्वत:ला टेस्ट क्रिकेट आवडत आणि तो कायमच टेस्ट क्रिकेटला लोकप्रिय बनवण्याबाबत बोलतो. टेस्ट क्रिकेटचा रोमांच वाढवण्यासाठी आयसीसीने उचलेल्या या पावलाचं गांगुलीने कौतुक केलं. 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळवण्याची आयसीसीची कल्पना उत्कृष्ट आहे. टेस्ट क्रिकेट सगळ्यात मोठा आणि मजबूत फॉरमॅट आहे आणि याची फायनल झाली पाहिजे. एक फायनल झाली पाहिजे का तीन, याबाबत बोलणं लवकरचं ठरेल. आता कुठे सुरुवात झाली आहे, हा पहिलाच सिझन होता. आयसीसी सगळ्यांकडू प्रतिक्रिया घेईल आणि भविष्यात याबाबत विचार करेल,' असं गांगुली म्हणाला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर भारतीय टीम इंग्लंडमध्येच 20 दिवसांची विश्रांती घेत आहे. ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पुढच्या मोसमातली भारताची ही पहिलीच सीरिज असेल.

First published:

Tags: Cricket, Sourav ganguly, Team india, Virat kohli