मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs PAK सीरिज होणार का? सौरव गांगुलीने दिली मोठी Update

IND vs PAK सीरिज होणार का? सौरव गांगुलीने दिली मोठी Update

गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. आयसीसी स्पर्धा (ICC Trophy) आणि आशिया कप (Asia Cup) वगळता या दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत.

    मुंबई, 15 नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. आयसीसी स्पर्धा (ICC Trophy) आणि आशिया कप (Asia Cup) वगळता या दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत. 2012-13 साली भारत-पाकिस्तान यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज झाली होती. दोन्ही देशांमधल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी दोन्ही देशांमध्ये पुन्हा क्रिकेट सुरू व्हावं, अशी मागणी केली आहे. यानंतर आता बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. एक क्रिकेट बोर्ड कोणत्याही निर्णयापर्यंत येऊ शकत नाही, असं गांगुली म्हणाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही दिवसांपूर्वीच टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) मॅच झाली होती. हा सामना स्पर्धेतला सर्वाधिक पाहिला गेलेला ठरला. भारत-पाकिस्तान फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. यावर बोलताना गांगुली म्हणाला की दोन देशांमध्ये क्रिकेट खेळण्याबाबत संबंधित सरकारांना काम करावं लागेल. 'हे क्रिकेट बोर्डांच्या हातात नाही. जागतिक स्पर्धांमध्ये दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध खेळतात. दोन्ही देशांमधलं क्रिकेट कित्येक वर्षांपासून थांबलं आहे. यावर दोन्ही देशांच्या सरकारला काम करावं लागेल. हे रमीझ राजांच्या हातात नाही किंवा माझ्या,' अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली. भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने सुरू व्हावेत, यासाठी आपण जय शाह आणि सौरव गांगुलीसोबत बोललो असल्याचं रमीझ राजा काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. राजकारणाला खेळापासून लांब ठेवलं पाहिजे, असं मत राजा यांनी मांडलं होतं. शारजाहमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सौरव गांगुलीने 2004 सालच्या दौऱ्याची आठवण सांगितली. लाहोरमध्ये कबाब खाण्यासाठी मी सुरक्षेचे नियम तोडले होते. यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी मला फोन केला आणि सुरक्षा नियम तोडू नकोस, त्याशिवाय काहीही कर, असं सांगितल्याचं गांगुली म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs Pakistan

    पुढील बातम्या