...म्हणून शेवटच्याक्षणी सौरभ गांगुलीने घेतला होता धोनीला तिसऱ्या स्थानावर पाठवायचा निर्णय

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2018 09:51 AM IST

...म्हणून शेवटच्याक्षणी सौरभ गांगुलीने घेतला होता धोनीला तिसऱ्या स्थानावर पाठवायचा निर्णय

महेंद्र सिंग धोनीवर आलेला एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा तर तुम्ही पाहिलाच असेल. सिनेमात सौरव गांगुलीला भारतीय क्रिकेट संघ निवडायचा असतो तेव्हा तो धोनीला संघात स्थान देतो असे दृश्य दाखवण्यात आले आहे. वास्तवातही काहीसे असेच झाले होते. याबद्दल खुद्द दादा अर्थात गांगुलीनेच सांगितले.

एका मुलाखतीत गांगुली म्हणाला की त्याने त्याच्या रिस्कवर धोनीला तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला पाठवले होते. गांगुलीला त्याच्या या निर्णयाचा आज नक्कीच अभिमान वाटत असेल. कारण धोनीवर त्याने दाखवलेला विश्वास माहीने फोल ठरवला नाही.

मुलाखतीत गांगुली म्हणाला की, ‘जेव्हा धोनी २००४ मध्ये भारतीय संघात आला होता, तेव्हा सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये त्याने सातव्या नंबरवर फलंदाजी केली होती. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी जेव्हा संघाची घोषणा करण्यात आली तेव्हाही धोनीसाठी सातवा नंबर निश्चित करण्यात आला होता.

तेव्हा मी माझ्या खोलीत बसून बातम्या पाहत होतो. पण धोनीला मी एक खेळाडू कसा बनवू याचाच विचार डोक्यात सुरू होता. मला दिसत होतं की त्यात एक सर्वोत्तम खेळाडू होण्याचे सर्व गुण आहेत. दुसऱ्या दिवशी आम्ही नाणेफेक जिंकलो तेव्हा मी निश्चित केले की धोनीला तिसऱ्या स्थानावर खेळायला पाठवायचे आणि पुढे जे होईल ते पाहून घ्यायचं.’

गांगुली भूतकाळाला उजाळा देताना म्हणाला की, ‘धोनी तेव्हा शॉर्ट पॅन्टमध्ये बसला होता. त्याला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला जायचे याचा विचारही त्याच्या डोक्यात नव्हता. मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो की एमएस तुला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला जायचे आहे. त्याने मला प्रतिप्रश्न करत विचारले, ‘मग तुम्ही कुठल्या स्थानावर जाणार?’ तेव्हा मी त्याला सांगितले की मी चौथ्या स्थानावर जाईन.’

Loading...

गांगुलीचा हा प्रयोग यशस्वी ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात धोनीने १४८ धावा केल्या. या सामन्यात माहीने १५ चौकार आणि ४ षटकार लगावले. तो सामना भारताने ५८ धावांनी जिंकला. धोनी त्या सामन्याचा सामनावीर ठरला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2018 09:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...