मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Women's IPL: लवकरच महिला आयपीएल सुरु होणार, सौरव गांगुलीची मोठी घोषणा

Women's IPL: लवकरच महिला आयपीएल सुरु होणार, सौरव गांगुलीची मोठी घोषणा

Womens IPL

Womens IPL

बीसीसीआयने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआय लवकरच महिला आयपीएल (Womens IPL) सुरू करण्याचा विचार करत असून महिला आयपीएल (IPL) 2023 मध्ये सुरू होऊ शकते.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी: बीसीसीआयने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआय लवकरच महिला आयपीएल (Womens IPL) सुरू करण्याचा विचार करत असून महिला आयपीएल (IPL) 2023 मध्ये सुरू होऊ शकते. अशी माहिती क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मोठी घोषणा करत दिली आहे.

जगभरात महिला क्रिकेटलादेखील चांगली लोकप्रियता मिळते आहे. त्यामुळे आता महिलांचा संघ आयपीएलकडे वळणार आहे. महिला आयपीएलची (Women's IPL) मागणीही बऱ्याच दिवसांपासून होत होती. अर्थात बीसीसीआयकडून (BCCI) ही मागणी वेगवेगळ्या कारणांमुळे मान्य झाली नव्हती. मात्र आता क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआय 2023 पासून महिला आयपीएल (IPL) सुरू करण्याचा विचार करत असल्याचे गांगुलीने म्हटले आहे.

महिला इंडियन प्रीमियर लीग (Women's Indian Premier League) सुरू करण्याच्या शक्यतेची वाच्यता गांगुलीने केली आहे. 2023 मध्ये ही पूर्ण महिला लीग सुरू करण्यासाठी खूप चांगली वेळ असेल. त्यावेळेस ही स्पर्धा पुरुषांच्या आयपीएल इतकी मोठी आणि भव्य असेल असे गांगुलीने म्हटले. महत्त्वाचे म्हणजे क्रिकेट मंडळ महिला T20 स्पर्धांचे आयोजन करते आहे.

मिताली राज, स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांसारख्या अनेक भारतीय महिला तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी महिला आयपीएल सुरु करण्याची मागणी केली होती.

तसेच, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले आहे की,  महिला संघाचे टी 20 चॅलेंज यावर्षी सुरू राहणार आहे. लवकरच परिस्थिती बदलेल. बीसीसीआय लवकरच आयपीएल सारखी महिला लीग सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल अशी खात्रीदेखील त्यांनी यावेळी दिली.

First published:

Tags: Indian women's team, Ipl, Sourav ganguly