मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सौरव गांगुली पुन्हा वादात, महिलांबद्दलचं ते वक्तव्य भोवलं!

सौरव गांगुली पुन्हा वादात, महिलांबद्दलचं ते वक्तव्य भोवलं!

sourav ganguly

sourav ganguly

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) गेल्या काही दिवसांपासून वादात अडकला आहे.

    मुंबई, 22 डिसेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) गेल्या काही दिवसांपासून वादात अडकला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सौरव गांगुलीचा दावा खोटा ठरवला, त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाद उफाळून आला. विराट कोहलीला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, त्यानंतर हा वाद सुरू झाला. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं होतं पण तरीही त्याने टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडली. यानंतर निवड समितीला मर्यादित ओव्हरसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं गांगुली म्हणाला. दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायच्या आधी विराट कोहलीने गांगुलीचं हे वक्तव्य खोडून काढलं, आपल्याला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं कोणीही सांगितलं नव्हतं, असं विराट कोहली म्हणाला. विराटच्या या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये वादळ आलं. विराट कोहलीसोबतचा वाद संपत नाही तोच आता गांगुली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सौरव गांगुलीने एका जाहीर कार्यक्रमात महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो अडचणीत आला आहे. बीसीसीआय अध्यक्ष म्हणून तणाव येतो का? असा प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला, तेव्हा त्याने आयुष्यात कोणताही तणाव नाही, फक्त पत्नी आणि गर्लफ्रेंडच तणाव देतात, असं वक्तव्य गांगुलीने केलं. सौरव गांगुलीचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे. अशाप्रकारे वक्तव्य केल्यामुळे अनेकांनी गांगुली लिंगभेदी असल्याची टीका केली आहे. याच कार्यक्रमात बोलताना गांगुलीने विराट कोहलीवरही भाष्य केलं. मला विराट कोहलीचा ऍटिट्यूट आवडतो, पण तो खूप भांडतो, असं सौरव गांगुली म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या