अर्जेंटिनाचे महान फूटबॉलपटू डियागो मॅरडोना (Diego Maradona) यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं. वयाच्या 60 व्या वर्षी मॅरडोना यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) सह अनेक दिग्गजांनी मॅरडोना याला श्रद्धांजली वाहिली.
मुंबई, 25 नोव्हेंबर : अर्जेंटिनाचे महान फूटबॉलपटू डियागो मॅरडोना (Diego Maradona) यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं. वयाच्या 60 व्या वर्षी मॅरडोना यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) सह अनेक दिग्गजांनी मॅरडोना याला श्रद्धांजली वाहिली. 'माझा हिरो आता या दुनियेत नाही, त्याच्या आत्म्याला शांती मिळो. मी फक्त त्याच्यासाठीच फूटबॉल बघायचो,' असं ट्विट सौरव गांगुलीने केलं आहे. या ट्विटसोबतच गांगुलीने त्याच्या आणि मॅरडोना यांच्या भेटीचा एक फोटो जोडला आहे.
ब्राझीलचा फूटबॉलपटू पेलेने मॅरडोना यांच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहिली आहे. स्वर्गात आपण दोघं एकत्र फूटबॉल खेळू, अशी अपेक्षा असल्याचं पेले म्हणाले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मॅरडोना यांच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहिली. फूटबॉल सुंदर खेळ का आहे, हे मॅरडोना नावाच्या जादूगारामुळे समजलं, त्यांच्या कुटुंबिय, मित्र आणि चाहत्यांप्रती माझी संवेदना, असं ट्विट राहुल गांधींनी केलं.
Diego #Maradona, the legend has left us. He was a magician who showed us why football is called “The beautiful game”.
पश्चिम बंगालचे भाजप खासदार आणि गायक बाबुल सुप्रिया यांनीही ट्विट करून फूटबॉलचा मृत्यू झाल्याची भावना बोलून दाखवली. आपल्या काळातल्या सर्वोत्तम फूटबॉलपटूला गमवाल्याचं वीरेंद्र सेहवाग म्हणाला. तर कोलकाता नाईट रायडर्सनेही मॅरडोना यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं. देवाने तुम्हाला लवकर बोलावलं, तुम्ही निघून गेलात तरी तुमच्या आठवणी कायमच लक्षात राहतील, असं ट्विट केकेआरने केलं.
Such sad news of the passing of an icon and a legend. A man who defined an era and brought joy and inspiration to many millions around the world. Rest In Peace Diego Maradona.
श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकाराही मॅरडोना यांना श्रद्धांजली देताना भावुक झाला. एका महान खेळाडूच्या मृत्यूची वाईट बातमी मिळाली आहे. जगातल्या लाखो लोकांसाठी ते प्रेरणेचा स्त्रोत ठरले. मॅरडोना यांच्या आत्म्याला शांती लाभो, असं संगकारा म्हणाला.