Sourav Ganguly Health :...त्यानंतरच गांगुलीच्या शरिरात स्टेन्ट टाकण्याचा निर्णय होणार

Sourav Ganguly Health :...त्यानंतरच गांगुलीच्या शरिरात स्टेन्ट टाकण्याचा निर्णय होणार

बीसीसीआय(BCCI) चा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) ला पुन्हा एकदा छातीत दुखायला लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  • Share this:

कोलकाता, 28 जानेवारी : बीसीसीआय(BCCI) चा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) ला पुन्हा एकदा छातीत दुखायला लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गुरूवारी सौरव गांगुलीच्या अनेक मेडिकल टेस्ट करण्यात आला. या टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर पुढच्या उपचारांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. गांगुलीवर उपचार करत असलेल्या टीममधल्या एका वरिष्ठ डॉक्टरनी याबाबत माहिती दिली. सौरव गांगुलीवर एन्जियोग्राफी व्हायची शक्यता आहे. टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर गांगुलीच्या रक्तवाहिनीमध्ये स्टेन्ट घालण्याची गरज आहे का नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.

'गांगुलीला काल रात्री चांगली झोप आली, त्याने सकाळी हलका फुलका नाश्ता केला. आजच्या टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर पुढच्या उपचारांबाबत निर्णय घेतला जाईल,' असं डॉक्टर म्हणाले. लोकप्रिय डॉक्टर देवी शेट्टी हेदेखील आज संध्याकाळी रुग्णालयात येणार आहेत. ते गांगुलीच्या टेस्टचे रिपोर्ट बघितल्यानंतर पुढच्या उपचारांबाबत इतर डॉक्टरांशी सल्लामसलत करून निर्णय घेतील.

'रिपोर्ट आल्यानंतर गांगुलीच्या धमण्यांमधले ब्लॉकेज काढण्यासाठी स्टेन्टची गरज आहे का नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल,' अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सकाळी सौरव गांगुलीला फोन करून त्याच्या तब्येतीची माहिती घेतली. माकपचे नेते अशोक भट्टाचार्यही गांगुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते.

कोलकाता पोलिसांनी गांगुलीला घरातून रुग्णालयात पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडोअर बनवला होता. याआधी या महिन्याच्या सुरूवातीला गांगुलीला घरात ट्रेड मिलवर चालत असताना छातीत दुखायला लागलं. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गांगुलीवर उपचार करण्यासाठी 9 सदस्यांची टीम बनवण्यात आली होती. डॉक्टर देवी शेट्टी, आर.के.पांडा, सॅम्युअल मॅथ्यू, अश्विन मेहता आणि न्यूयॉर्कमधून शमिन के शर्मा यांचा सल्ला घेऊन गांगुलीच्या रक्तवाहिनीमध्ये स्टेन्ट टाकण्यात आली होती.

Published by: Shreyas
First published: January 28, 2021, 5:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या