कोलकाता, 2 डिसेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) च्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सौरव गांगुलीची पहिली एन्जियोप्लास्टी (Angeoplasty) करण्यात आली आहे. यामध्ये त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेन टाकण्यात आली आहे. गांगुलीच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत. एका रक्तवाहिनीत 90 टक्के ब्लॉकेज आहे. सर्जरीनंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवसांत त्याच्या हृदयात आणखी दोन स्टेंट्स टाकले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुलीला फोन करून त्याच्या तब्येतीविषयीची माहिती जाणून घेतली आहे. याशिवाय केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजूजू यांनीही डोना गांगुलीला फोन करून चौकशी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही रुग्णालयात जाऊन सौरव गांगुलीची भेट घेणार आहेत.
घरामध्ये ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना गांगुलीच्या छातीत दुखायला लागलं आणि त्याला चक्कर येऊ लागली आणि डोकं दुखू लागलं. दुपारी एक वाजता त्याला रुग्णालयात आणण्यात आलं, तेव्हा त्याचा पल्स रेट 70 प्रती मिनीट तर ब्लड प्रेशर 130/80 MM एवढं होतं. गांगुलीच्या कुटुंबातही अनेकांना याआधी हृदयविकाराचा त्रास होता.
काय म्हणाले डॉक्टर?
सौरव गांगुलीला सौम्य असा हृदयविकाराचा धक्का लागला, तो योग्यवेळी रुग्णालयात आला. आता त्याची तब्येत स्थिर आणि चांगली आहे, असं वूडलॅन्ड्स रुग्णालयाचे डॉक्टर खान यांनी सांगितलं.
Sourav Ganguly has undergone angioplasty. He is stable now. He will be monitored for 24 hours. He is completely conscious. There are two blockages in his heart for which he will be treated: Dr Aftab Khan, Woodlands Hospital, Kolkata. pic.twitter.com/ackcaGwJKu
— ANI (@ANI) January 2, 2021
सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. गांगुलीच्या नेतृत्वातच भारताने मोठ्या टीमविरुद्ध विजय मिळवायला सुरूवात केली. 2003 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली होती. तसंच 2004 साली पाकिस्तान दौऱ्यातही भारताचा विजय झाला होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गांगुलीने क्रिकेट प्रशासनामध्ये एन्ट्री घेतली. काही वर्ष गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता, यानंतर मागच्याच वर्षी गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.