भारताच्या क्रिकेटमध्ये आजही का चालते गांगुलीचा 'दादा'गिरी, जाणून घ्या कारण

भारताच्या क्रिकेटमध्ये आजही का चालते गांगुलीचा 'दादा'गिरी, जाणून घ्या कारण

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची 'दादा'गिरी आता BCCI मध्येही चालणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्षपदाची औपचारीक घोषणा उरली आहे. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. गांगुलीशिवाय कोणीही अर्ज भरला नसल्यानं त्याची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय संघात अमुलाग्र बदल करणाऱ्या आणि भारताच्या क्रिकेटला वेगळीच दिशा देणारा कर्णधार म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. गांगुलीकडे असलेल्या नेतृत्वगुण, संघातील खेळाडूंच्या पाठिशी नेहमीच उभा राहणं आणि नव्या खेळाडूंना संधी देण्याची कामगिरी त्यानं केली.

सौरव गांगुलीने फलंदाजीत तर विक्रम केलेच पण कर्णधार म्हणून त्यानं जगभरात नाव कमावलं. भारतीय संघाच्या पडत्या काळात गांगुलीने नेतृत्व केलं आणि संघाला पुन्हा उभा केलं. खेळाडूंना प्रोत्साहन देताना नेहमीच त्यांना पाठिंबा दिला. गांगुलीने टाकलेला विश्वास खेळाडूंनीही सार्थ ठरवला. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना संघात आत्मविश्वास निर्माण झाला.

भारतीय क्रिकेटवर 2000 मध्ये मॅच फिक्सिंगचा डाग पडला. त्यावेळी चाहत्यांच्या रोषाला संघ सामोरा जात होता. अशा परिस्थितीत संघाचं नेतृत्व करताना संघ बांधणी केली. सर्वांना एकत्र घेऊन अनेक विजय मिळवले. यानंतर लोकांनी पुन्हा संघावर विश्वास ठेवायला सुरुवात केला.

गांगुलीच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गज खेळाडू तयार झाले. यामध्ये युवराज सिंग, जहीर खान, महेंद्रसिंग धोनी, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग यांचा समावेश आहे. यांच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात गांगुलीच्या नेतृत्वाखाली झाली. याशिवाय अजित आगरकर, आशिष नेहराने गांगुलीच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी केली.

भारताच्या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी गांगुलीने आक्रमक पद्धत अवलंबली. त्यानं नेतृत्वात आणि खेळात आक्रमकता आणली आणि या जोरावर अनेक विजय मिळवून दिले. 2002 मध्ये लॉर्ड्सवर मिळवलेल्या विजय आणि तिथं टीशर्ट काढून केलेला जल्लोष आजही अनेकांच्या लक्षात आहे.

भारताला परदेशात विजय मिळवणं दुरापास्त होतं. तेव्हा गांगुलीने भारतीय संघाला परदेशात विजय मिळवण्याची सवय लावली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात दमदार कामगिरी करून दाखवली. आकडेवारीच्या बाबतीत धोनी, विराट सरस असले तरीसुद्धा गांगुलीला सर्वात यशस्वी कर्णधार मानलं जातं.

VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

Published by: Suraj Yadav
First published: October 15, 2019, 10:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading