मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सौरव गांगुलीला ओमायक्रॉनची लागण? समोर आली मोठी Update

सौरव गांगुलीला ओमायक्रॉनची लागण? समोर आली मोठी Update

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याची कोरोना टेस्ट (Sourav Ganguly Corona Positive) पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

  • Published by:  Shreyas

कोलकाता, 29 डिसेंबर : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याची कोरोना टेस्ट (Sourav Ganguly Corona Positive) पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता गांगुलीच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती (Sourav Ganguly Health Update) समोर आली आहे. गांगुलीची तब्येत सध्या स्थिर आहे, तसंच त्याचे ओमायक्रॉन (Omicron) रिपोर्ट उद्या येणार आहेत. या रिपोर्टनंतरच त्याला डिस्चार्ज द्यायचा का नाही, याबाबत निर्णय होणार आहे.

वूडलँड्स हॉस्पिटलच्या सीईओ डॉक्टर रुपाली बासू यांनी गांगुलीच्या तब्येतीबाबत माहिती दिली. 'रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गांगुलीची हृदयगती स्थिर आहे, त्याला ताप नाही, तसंच कृत्रिम ऑक्सिजन शिवाय त्याची ऑक्सिजन लेव्हल 99 टक्के आहे,' असं रुपाली बासू यांनी सांगितलं.

'गांगुली रात्री चांगला झोपला, तसंच त्याने सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवणही केलं. सोमवारी त्याला मोनोकलोनल ऍण्टीबॉडी कॉकटेल थेरपी देण्यात आली,' असं डॉक्टर रुपाली बासू म्हणाल्या. गांगुलीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. व्यावसायिक कामांसाठी तो मोठ्या प्रमाणावर प्रवास करत होता.

गांगुलीला यावर्षी आधीही दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर एन्जियोप्लास्टीही करण्यात आली. याचवर्षी गांगुलीचा भाऊ स्नेहशिष गांगुलीही कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

First published:

Tags: Sourav ganguly