कोलकाता, 2 जानेवारी : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला हृदयविकाराचा सौम्य धक्का लागला आहे. त्याच्यावर सध्या कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सौरव गांगुलीच्या तब्येतीबाबत रुग्णालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
घरामध्ये ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना गांगुलीच्या छातीत दुखायला लागलं आणि त्याला चक्कर यायला लागली. गांगुलीच्या कुटुंबामध्येही अनेकांना याआधी हृदयविकाराचा त्रास होता. दुपारी एक वाजता त्याला रुग्णालयात आणण्यात आलं, तेव्हा त्याचा पल्स रेट 70 प्रती मिनीट तर ब्लड प्रेशर 130/80 MM एवढं होतं. बाकीच्या चाचण्यांमध्ये गांगुलीची तब्येत स्थिर असल्याचं समोर आलं आहे.
Sourav Ganguly is stable haemodynamically. He has received loading doses of dual anti platelets and statin and is undergoing primary angioplasty now: Dr Rupali Basu, MD & CEO, Woodlands https://t.co/neXSwr5UUG
— ANI (@ANI) January 2, 2021
सौरव गांगुलीला ड्युअल एन्टी प्लेटलेट्स आणि स्टॅटिन देण्यात आलं आहे, तसंच त्याच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली आहे. एन्जियोप्लास्टी करताना गांगुलीच्या शरिरात एक स्टेन्ट इमप्लान्ट (Stent Implant) करण्यात आली आहे. गांगुलीच्या तब्येतीबाबत पुढील माहिती संध्याकाळी 5 वाजता देऊ, असं वूडलॅन्ड्स रुग्णालयाच्या एमडी आणि सीईओ डॉक्टर रुपाली बसू यांनी सांगितलं आहे.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी सौरव गांगुलीच्या पत्नीला फोन करून त्याच्या तब्येतीविषयी माहिती घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.