सौरव गांगुलीच्या भावावरही होणार ऍन्जियोप्लास्टी

सौरव गांगुलीच्या भावावरही होणार ऍन्जियोप्लास्टी

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यावर काहीच दिवसांपूर्वी एन्जियोप्लास्टी करण्यात आली होती.

  • Share this:

कोलकाता, 19 जानेवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यावर काहीच दिवसांपूर्वी एन्जियोप्लास्टी करण्यात आली होती. घरामध्ये ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना सौरव गांगुलीच्या छातीत दुखायला लागलं, यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सौरव गांगुलीला सौम्य हृदयविकाराचा धक्काही लागला, तसंच त्याच्या हृदयातल्या रक्तवाहिन्यांमध्ये 3 ब्लॉक झाल्याचं समोर आल्यामुळे एन्जियोप्लास्टी करण्यात आली. यानंतर आता सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहशिष गांगुली याच्या हृदयातल्या रक्तवाहिन्यांमध्येही ब्लॉक झाल्याचं समोर आलं आहे. स्नेहशिष गांगुली यांच्यावरही एन्जियोप्लास्टी करण्यात आली आहे.

'रुग्णालयातून घरी आल्यानंतर सौरवने मला काही टेस्ट करून घ्यायला सांगितल्या. या टेस्ट केल्यानंतर माझ्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्येही ब्लॉक झाल्याचं आढळून आलं, त्यामुळे मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. 22 जानेवारीला ब्लॉकेज झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकण्यात येतील,' असं स्नेहशिष यांनी सांगितलं. सौरव गांगुली ज्या रुग्णालयात उपचार घेत होता, तिकडेच स्नेहशिष यांच्यावरही एन्जियोप्लास्टी करण्यात येणार आहे. सौरव गांगुली हा सध्या घरी आराम करत आहे. सौरव गांगुलीचे मोठे बंधू असलेले स्नेहशिष गांगुली हे पश्चिम बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळले आहेत.

Published by: Shreyas
First published: January 19, 2021, 9:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या