मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

यंदाच्या IPL 2020 मध्ये लागू होणार नवीन नियम, सौरभ गांगुलींनी केली घोषणा

यंदाच्या IPL 2020 मध्ये लागू होणार नवीन नियम, सौरभ गांगुलींनी केली घोषणा

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी आयपीएलचा हंगाम 29 मार्च ते 24 मे पर्यंत खेळला जाणार आहे. यावेळी एकूण 56 सामने होणार आहेत. गेल्या 12 वर्षांप्रमाणेच यावेळी चाहत्यांना आयपीएलचा थरार पाहायला मिळेल.

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी आयपीएलचा हंगाम 29 मार्च ते 24 मे पर्यंत खेळला जाणार आहे. यावेळी एकूण 56 सामने होणार आहेत. गेल्या 12 वर्षांप्रमाणेच यावेळी चाहत्यांना आयपीएलचा थरार पाहायला मिळेल.

इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या स्पर्धा 29 मार्चला सुरू होणार आहेत.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 27 जानेवारी :  इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 2020 सीझन (IPl 2020) साठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली  यांनी नवीन नियमाची घोषणा केली आहे.  सौरंभ गांगुली यांनी सोमवारी गर्व्हिंग काऊंसिलची बैठक घेतली.  या बैठकीमध्ये आयपीएल 2020 मध्ये नवीन नियम लागू होणार आहे. हाच नियम आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू होता.

आयपीएल (Indian Premier League) च्या नवीन सीझनमध्ये  कनेक्शन सबस्टिट्यूट नियम लागू  होणार आहे.  जर एखाद्या खेळाडूला फलंदाजी आणि गोलंदाजी करत असताना दुखापत झाली तर तो सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. त्याची जागी दुसरा खेळाडू घेईल. याला कनेक्शन नियम म्हटले जाते.

तसंच आयपीएलच्या आधी बीसीबीआय जगभरातील इतर खेळाडूंना सोबत घेऊन एक ऑल स्टार्स सामना आयोजित करणार आहे. हा सामना मदतनिधी गोळा करण्यासाठी असणार आहे.

यावर सौरंभ गांगुलीने खुलासा केला आहे की, आम्ही आयपीएलसाठी नवीन नियम आणि इतर स्टार खेळाडूंचा सामना घेऊन येत आहोत. याचा अंतिम सामना हा मुंबईतच खेळवण्यात येणार आहे. या सिझनमध्ये डबल हेडर म्हणजेच एक दिवसामध्ये दोन सामने खेळवण्यात येणार आहे.  अशात पहिला सामना हा चार वाजता आणि दुसरा आठ वाजता होणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा लवकरच याबद्दल घोषणा करणार आहे.

हार्दिक पांड्या टीम इंडियामध्ये कधी खेळणार असा सवाल विचारण्यात आला असता. सौरंभ गांगुलींनी स्पष्ट केलं की,  'हार्दिक अजून फीट नाही. त्याच्यावर एनसीएमध्ये उपचार सुरू आहे. त्याला आणखी वेळ लागणार आहे.'

इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या स्पर्धा 29 मार्चला सुरू होणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईत होईल, अशी माहितीही सौरव गांगुली यांनी दिली. आयपीएलच्या 13 व्या हंगामात वेळी झालेल्या बैठकीत अंतिम सामना मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यंदा एकाच दिवशी दोन सामने खेळवण्याचे प्रमाणही कमी केले आहे. तसंच डे-नाइट सामन्याच्या वेळेतबाबतही निर्णय घेतला गेला.

आयपीएलच्या 13 व्या हंगामात अंतिम सामना अहमदाबादला होईल असं म्हटलं जात होतं. मात्र, अंतिम सामन्यासाठी मुंबईवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तसेच सामन्यांची वेळ रात्री 8 वाजता निश्चित करण्यात आली आहे. सामने रात्री साडेसात वाजता सुरु करण्याचीही मागणी करण्यात आली होती. मात्र, वेळेत बदल न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

First published:

Tags: Ipl, IPL 2020, Sourav ganguly