BIG NEWS: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली छातीमध्ये दुखत असल्यानं पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल
Sourav Ganguly Chest Pain: गांगुलीला वुडलँड्स हॉस्पिटलमधून सात जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर तीन आठवड्याच्या आतच गांगुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
कोलकाता, 27 जानेवारी : बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांना छातीमध्ये दुखत असल्यानं पुन्हा एकदा कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ANI वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. सौरव गांगुली (sourav ganguly health) यांना या महिन्याच्या सुरुवातीला हार्टअटॅक आला होता. त्यानंतर त्यांच्यावर कोलकात्याच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. आता गांगुलीला अपोलो हॉस्पिटलमध्ये (Apollo Hospital) दाखल करण्यात आलं आहे. सौरव गांगुलींची तब्येत ठीक आहे, व्यवस्थित बोलता येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती समोर येते आहे.
गांगुलीला 2 जानेवारी रोजी रोजी छातीत दुखत असल्यामुळे आणि चक्कर येत असल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स हॉस्पिटलमध्ये सौरव गांगुलीवर उपचार करण्यात आले. त्यावेळी गांगुलीला गांगुलीला सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर त्याच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली. सौरव गांगुलीच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाले होते. त्याची दुसरी एन्जियोप्लास्टी नंतर होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती.
BCCI Chief Sourav Ganguly being taken to Apollo Hospital in Kolkata after he complained of chest pain. More details awaited.
गांगुलीला वुडलँड्स हॉस्पिटलमधून सात जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर तीन आठवड्याच्या आतच गांगुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.