क्रिकेटर मोहम्मद शमीला शिवीगाळ, तिघांना अटक

क्रिकेटर मोहम्मद शमीला शिवीगाळ, तिघांना अटक

शमीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे शिवीगाळ करणाऱ्यांची ओळख पटवली असून चौघा आरोपींना ताब्यातही घेतलंय.

  • Share this:

18 जुलै : भारतीय क्रिकेट संघातील तेज गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकाता इथे चौघांनी शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केलाय. शमीने या चौघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या चौघांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाणीचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी इमारतीच्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण केली, असा आरोप शमीने त्याच्या तक्रारीत केलाय.

शमीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे शिवीगाळ करणाऱ्यांची ओळख पटवली असून चौघा आरोपींना ताब्यातही घेतलंय. त्यांना अटक केल्यानंतर काही काळात त्यांची जामीनावर मुक्तताही झालीय.

इमारतीच्या परिसरात कार पार्किंग करताना झालेल्या वादातून ही घटना घडल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 11:02 AM IST

ताज्या बातम्या