मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Soldierathon: सैनिकांच्या सन्मानासाठी देशात एकाच वेळी धावणार १३ हजार रनर्स

Soldierathon: सैनिकांच्या सन्मानासाठी देशात एकाच वेळी धावणार १३ हजार रनर्स

मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया आणि शिल्पा भगत

मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया आणि शिल्पा भगत

Soldierathon: ‘सोल्जरेथॉन’ची सुरुवात मार्च 2018 साली झाली होती. हे या मॅरेथॉनच तिसरं वर्ष आहे. मातृभूमीचे संरक्षण करणाऱ्या आपल्या लाखो सैनिकांच्या सन्मानासाठी, त्यांना मानवंदना देण्याच्या उद्देशानं या रनची संकल्पना अंमलात आली.

  मुंबई, १३ ऑगस्ट: देशाचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानासाठी ‘फिटिस्तान- एक तंदरुस्त भारत’ यांच्या वतीनं 14 ऑगस्ट रोजी देशभरात ‘सोल्जरेथॉन-फ्रिडम रन’चं आयोजन करण्यात आलं आहे. 14 ऑगस्टच्या सकाळी साडेसहा वाजता देशातल्या अनेक भागात या फ्रिडम रनला सुरुवात होणार आहे. मुंबईतही वेगवेगळ्या 15 ठिकाणाहून या रनचं आयोजन करण्यात आलं आहे. काल मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात भारतीय स्पेशल फोर्समध्ये माजी अधिकारी असलेल्या मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया यांनी या अनोख्या फ्रिडम रनबाबत माहिती दिली. सोल्जरेथॉन-फ्रिडम रनची वैशिष्ट्ये ‘सोल्जरेथॉन’ची सुरुवात मार्च 2018 साली झाली होती. हे या मॅरेथॉनच तिसरं वर्ष आहे. मातृभूमीचे संरक्षण करणाऱ्या आपल्या लाखो सैनिकांच्या सन्मानासाठी, त्यांना मानवंदना देण्याच्या उद्देशानं या रनची संकल्पना अंमलात आली. त्यामुळे यंदा स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून देशातील 115 ठिकाणी एकाच वेळी ही फ्रिडम रन होणार आहे. ज्यात तब्बल 13 हजार पेक्षा जास्त रनर धावणार आहेत. त्यामध्ये लष्करी अधिकारी, सैनिकांचाही समावेश असेल. ‘फिटिस्तान- एक तंदरुस्त भारत’ यांच्यातर्फे आयोजित ही रन 7.5 किमी. किंवा 75 मिनिटांची असेल. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना त्यांच्या इच्छेनुसार रन पूर्ण करता येणार आहे. केवळ धावपटूच नव्हे तर या रन मध्ये चालण्याचा आणि सायकलिंग प्रकाराचाही समावेश करण्यात आला आहे. हेही वाचा - Kho Kho League: खो खोची ‘अल्टिमेट’ लीग, पाहा मराठी मातीतल्या खेळाचं नवं रुप...
  काय आहे फिटिस्तान- एक तंदरुस्त भारत?
  ‘फिटिस्तान’ या कम्युनिटीची स्थापना स्पेशल फोर्सचे माजी अधिकारी मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया आणि माजी मिसेस वर्ल्ड इंडिया शिल्पा भगत यांनी मिळून केली आहे. देशभावनेसोबतच देशातील प्रत्येक नागरिकानं तंदरुस्त राहणं किती गरजेचं आहे याचं महत्व फिटिस्तान कम्युनिटीच्या कॅप्टन्सकडून पटवून दिलं जातं. फिट राहण्याची इच्छा असणं आणि वस्तुस्थिती यातील फरक भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी देशभरातील 36 शहरांमध्ये 51 फिटिस्तान कॅप्टन्स विखुरलेले आहेत. त्यात मुंबईसह अजमेर, पुणे, नवी मुंबई, रायपूर, जोधपूरसह इतर अनेक राज्यातील शहरांचा समावेश आहे.
  Published by:Siddhesh Kanase
  First published:

  Tags: Independence day, Sports

  पुढील बातम्या