इंग्लंड, ३० जुलैः महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये (डब्ल्यूसीएसएल) रविवारी २९ जुलैला वेस्टर्न स्टॉर्म आणि लॉफबरो लाइटनिंग संघामध्ये टी- २० सामना खेळवण्यात आला. या सामन्यात महाराष्ट्राची कन्या स्मृती मंधानाने १९ चेंडूत ५२ नाबाद धावा केल्या. स्मृतीने या सामन्यात चार षटकार आणि आणि पाच चौकार लगावले. याच खेळीसोबत स्मृती मंधानाने महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनशी बरोबरी केली आहे. स्मृती मंधाना KIA Super League स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.