टीम इंडियाला धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

टीम इंडियाला दुखापतींचे ग्रहण लागले असून आता आणखी एक क्रिकेटरला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 12:51 PM IST

टीम इंडियाला धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघांची मालिका सुरू आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पुरुष संघाने पहिली कसोटी जिंकली आहे. तर महिला टीम टी20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेच्या तयारीला लागली आहे. भारताची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधना दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही.

स्मृती मानधनाला सराव करताना दुखापत झाली. तिच्या जागी संघात कोणाला संधी मिळणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका भारतानं 3-1 ने जिंकली आहे.

टी20 मालिकेत स्मृती मानधनाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. तरीही एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिची भूमिका महत्त्वाची होती. स्मृतीने चार टी20 सामन्यात 21,13, 7, 5 अशा धावा काढल्या आहेत.

याआधी इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या महिला क्रिकेट सुपर लीगमध्येही स्मृती मानधना फॉर्ममध्ये नव्हती. तरीही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तिच्यामुळे संघाची फलंदाजी मजबूत होते. भारतीय महिला संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. तिन्ही सामने वडोदरा इथं होणार आहेत.

Loading...

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 12:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...