Elec-widget

सांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस

सांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस

बीसीसीआयने महिला क्रिकेटर स्मृती मानधनाच्या नावाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी ही माहिती दिली.

  • Share this:

26 एप्रिल : बीसीसीआयने महिला क्रिकेटर स्मृती मानधनाच्या नावाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी ही माहिती दिली. 21 वर्षांच्या स्मृती मानधनानं गेल्या वर्षीच्या महिला विश्वचषकात सातत्यपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातल्या मालिकेतही तिनं नऊ सामन्यांमध्ये 531 धावांचा रतीब घातला आहे.

स्मृती मानधना ही सध्या भारतीय महिला संघाच्या फलंदाजीचा कणा बनली आहे. धडाकेबाज सुरुवात करून, भारताला विजयापर्यंत पोहोचवण्याचं काम स्मृती करत आहे.

कोण आहे स्मृती मानधना?

- स्मृती श्रीनिवास मानधना मूळची सांगलीची

- जन्म 18 जुलै 1996 रोजी मुंबईत

Loading...

- 2 वर्षांची असताना कुटुंब सांगलीला स्थलांतरित

- घरातूनच क्रिकेटचं बाळकडू

- भाऊ महाराष्ट्राच्या 16 वर्षांखालील संघात होता

- अवघ्या नवव्या वर्षी 15 वर्षांखालील मुलींच्या संघात निवड

- 19 वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड

- वनडेमध्ये द्विशतक ठोकणारी पहिली महिला

- अंडर 19 स्पर्धेत बडोद्यातील सामन्यात 150 चेंडूत नाबाद 224 धावा

- 2016 - वुमन्स चॅलेंजर ट्रॉफीत 'इंडिया रेड'कडून खेळताना 3 अर्धशतकं

- 10 एप्रिल 2013 रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून भारताच्या वन डे संघात पदार्पण

- ऑगस्ट 2014 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण

- 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पहिलं शतक

- आयसीसीच्या महिला क्रिकेट संघात स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...