महिला क्रिकेट टीममधील महाराष्ट्राच्या कन्यांचा सन्मान, प्रत्येक 50 लाखांचे बक्षीस जाहीर

महिला क्रिकेट टीममधील महाराष्ट्राच्या कन्यांचा सन्मान, प्रत्येक 50 लाखांचे बक्षीस जाहीर

महिला वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्यांचा राज्य सरकारने प्रत्येकी 50 लाखांचं बक्षीस देऊन सन्मान केलाय.

  • Share this:

28 जुलै : आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्यांचा राज्य सरकारने प्रत्येकी 50 लाखांचं बक्षीस देऊन सन्मान केलाय.

भारतीय महिला क्रिकेट टीमने महिला वर्ल्डकपमध्ये आॅस्ट्रोलियाला हरवून फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र, फायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव जरी झाला तरी त्यांची कामगिरी वाखण्याजोगी होती. महिला टीम इंडियामध्ये महाराष्ट्रातील मुंबईची पूनम राऊत,  सांगलीची स्मृती मंधाना आणि नागपूरची मोना मिश्रम तीन खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी केली.

या तिन्ही खेळाडूंना प्रत्येक खेळाडूला 50 लाखांचं बक्षीस विधानसभेत जाहीर करण्यात आलंय. पूनम राऊत,  स्मृती मंधाना आणि मोना मिश्रम या महिला क्रिकेटपटू आज विधानभवनात दाखल झाल्या होत्या.  महाराष्ट्राच्या या कन्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं. यावेळी शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी प्रत्येकी 50 बक्षीस देण्याची घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2017 06:03 PM IST

ताज्या बातम्या