मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

SL vs SA : 'हनुमान भक्त' खेळाडू झाला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार, दुखापतीमुळे बऊमा बाहेर

SL vs SA : 'हनुमान भक्त' खेळाडू झाला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार, दुखापतीमुळे बऊमा बाहेर

श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेला (Sri Lanka vs South Africa) पहिली वनडे गमावल्यानंतर आणखी एक धक्का लागला आहे. टीमचा कर्णधार टेम्बा बऊमा (Temba Bavuma) दौऱ्यातून बाहेर झाला आहे. बऊमाच्या जागी केशव महाराजला (Keshav Maharaj) दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार करण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

कोलंबो, 3 सप्टेंबर : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेला (Sri Lanka vs South Africa) पहिली वनडे गमावल्यानंतर आणखी एक धक्का लागला आहे. टीमचा कर्णधार टेम्बा बऊमा (Temba Bavuma) उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे पूर्ण सीरिजमधून बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम श्रीलंका दौऱ्यावर 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. दोन्ही टीममध्ये गुरुवारी पहिली वनडे झाली होती, यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला होता.

टेम्बा बऊमाच्या जागी केशव महाराजला (Keshav Maharaj) दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार करण्यात आलं आहे. केशव महाराज भारतीय मूळ असलेला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. केशव महाराजचे पूर्वज भारत सोडून दक्षिण आफ्रिकेत गेले होते, पण तरीही त्यांनी हिंदू संस्कृतीशी आपली नाळ जोडून ठेवली. केशव महाराज आजही हनुमान भक्त आहे. पूजा करण्यासाठी तो हनुमानाच्या मंदिरातही जातो.

हनुमान मंदिराचे अनेक फोटो त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेकडून 36 टेस्ट आणि 12 वनडे खेळला आहे. त्याने टेस्टमध्ये 129 विकेट घेत 739 रन केल्या, तसंच वनडेमध्ये 15 विकेट घेतल्या.

बऊमा दक्षिण आफ्रिकेला परतणार

बऊमा लवकरात लवकर स्पेशलिस्ट डॉक्टरचा सल्ला घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला परतणार आहे. गुरुवारी पहिल्या वनडेदरम्यान बॅटिंग करताना बऊमाला दुखापत झाली. दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगची 26 वी ओव्हर सुरू असताना बऊमाने मिड विकेटच्या दिशेने शॉट मारला. पण यानंतर फिल्डरने केलेला थ्रो बऊमाच्या हातावर लागला, यानंतर त्याच्या अंगठ्यातून रक्त यायला लागलं आणि सूज आली.

दुखापत झाली तेव्हा बऊमा 38 रनवर खेळत होता, यानंतरही त्याने बॅटिंग सुरूच ठेवली. त्रास वाढायला लागल्यानंतर 28 व्या ओव्हरला 38 रनवरच तो रिटायर्ड हर्ट झाला. मैदानाबाहेर जाताना बऊमा आणि मार्करम यांच्यात 106 रनची पार्टनरशीप झाली होती.

मैदानाबाहेर नेल्यानंतर बऊमाला स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं, तेव्हा त्याचा अंगठा फ्रॅक्चरझाल्याचं समोर आलं. केशव महाराजला वनडे टीमचं नेतृत्व दिलेलं असलं, तरी टी-20 सीरिजसाठीच्या कर्णधाराची घोषणा नंतर करण्यात येणार आहे.

पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा 14 रनने पराभव केला होता. सीरिजची दुसरी वनडे शनिवारी आणि तिसरी वनडे मंगळवारी खेळवली जाईल. यानंतर दोन्ही देशांमध्ये टी-20 सीरिजला सुरुवात होईल.

First published:

Tags: South africa