नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टी-20 मालिका जिंकल्यानंतर एकदिवसीय आणि कसोटीत भारतानं निराशजनक कामगिरी केली. यानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळणार आहे. सततच्या क्रिकेटमधून सध्या टीम इंडियातील काही खेळाडू नाराज आहेत. याआधी कर्णधार विराट कोहलीनं सततच्या क्रिकेटला कंटाळून बीसीसीआयवर टीका केली होती. आता कोहलीच्या याच वक्तव्यावरून माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी निशाणा साधला आहे.
वाचा-दुसऱ्या सामन्याआधी विराटला मोठा धक्का! स्टार फलंदाज झाला जखमी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी आयपीएल 2020 पूर्वी खेळाडूंना सल्ला दिला आहे. कपिल यांनी, “क्रिकेटपटू नियमितपणे भारतीय क्रिकेट संघाकडून खेळतात आणि जर त्यांना असे वाटते की आंतरराष्ट्रीय कॅलेंडर त्यांच्यासाठी खूप व्यस्त आहे तर त्यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळणे सोडावे”, असे सांगितले. न्यूझीलंड दौऱ्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला होता की, क्रिकेटपटूंशी अशी स्थिती आहे की आता थेट आम्हाला स्टेडियममधून खेळायला सुरुवात करावी लागले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 0-1 असा पराभव पत्करावा लागला, तर दुसरी कसोटी 29 फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्च येथे खेळली जाणार आहे.
वाचा-टीम इंडियात मतभेद? ‘या’ खेळाडूसाठी अजिंक्य रहाणेने घेतला कॅप्टन कोहलीशी पंगा
एचसीएलच्या सन्मान सोहळ्याच्या पाचव्या आवृत्ती दरम्यान कपिल यांनी पत्रकारांना विराटच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते कर्णधारावर भडकले. यावेळी कपिल यांनी, 'तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर आयपीएल खेळू नका. आपण तेथे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत नाही त्यामुळे आपण थकल्यासारखे वाटत असल्यास आपण आयपीएल दरम्यान नेहमी ब्रेक घेऊ शकता. जेव्हा आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असाल तर वेगळी भावना असावी’, असे सांगत कोहलीची कानउघडणी केली.
वाचा-2 चेंडूंमध्ये हॅट्रिक घेण्याची जादू करणाऱ्या खेळाडूवर IPL मध्ये बंदी
कामाच्या दबावाला कंटाळला कोहली?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीला निवृत्तीबाबत विचारण्यात आले. यावेळी कोहलीने 2021 टी -20 वर्ल्ड कपनंतर कोणता तरी एक फॉर्मेट सोडण्याचा विचार करीत आहोत, असे स्पष्ट केले. याबाबत बोलताना कोहलीने, “तीन वर्षांपासून स्वत: ची तयारी करत आहे”, असे उत्तर दिले. कोणत्याही एका प्रकारातून निवृत्तीचा विचार करण्याऐवजी तो तीन वर्षांपासून स्वतःला तयार करण्यावर भर देत असल्याचे भारतीय कर्णधार म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Ipl, Kapil dev, Virat kohli