मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA: सिराजची टीम इंडियात एन्ट्री, पण टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचं तिकीट मिळणार?

Ind vs SA: सिराजची टीम इंडियात एन्ट्री, पण टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचं तिकीट मिळणार?

मोहम्मद सिराज आणि शमी

मोहम्मद सिराज आणि शमी

Ind vs SA: सिराज, दीपक चहर आणि शमी या तिघांपैकी वर्ल्ड कपच्या 15 सदस्यीय संघात कुणाची निवड होते आणि स्टँड बायमध्ये कोण राहतं हे पाहणं महत्वाचं ठरेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 30 सप्टेंबर: वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित टी20 सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान मिळालंय. बीसीसीआयनं आज सकाळीच याची घोषणा केली. जसप्रीत बुमराला पहिल्या टी20आधी सराव करताना दुखापत झाली आणि त्या दुखापतीमुळे त्याचं ऑस्ट्रेलियाचं वर्ल्ड कप तिकीटही कॅन्सल झालं आहे. त्यामुळे त्याच्या जागी वर्ल्ड कप संघात कुणाला संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शमी आणि दीपक चहर हे वर्ल्ड कप संघातले स्टँड बाय खेळाडू आहेत. पण आता सिराजची एन्ट्री झाल्यानं निवड समितीच्या मनात नेमकं काय आहे हे सांगता येणार नाही.

बुमराऐवजी शमीला का नाही?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका खेळता आली नाही. त्याच्याऐवजी ऐनवेळी उमेश यादवला संघात स्थान मिळालं. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी शमीचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले. याबाबत त्यानं बीसीसीआयला माहितीही दिली. पण बुमरा संघाबाहेर जाताच शमीऐवजी निवड समितीनं सिराजला टीममध्ये आणलं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

हेही वाचा - Jaspreet Bumrah: वर्षभरात केवळ 5 टी20, वर्ल्ड कपमधूनही 'आऊट', पाहा बुमराचं स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे नक्की काय?

वर्ल्ड कपसाठी कुणाला संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर भारतीय संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्याआधी 15 सदस्यीस संघात बुमराऐवजी कोण याचं चित्र स्पष्ट होईल. दरम्यान स्टँड बाय खेळाडू म्हणून निवड झालेले मोहम्मद शमी, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर हेदेखील भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. त्यामुळे सिराज, दीपक चहर आणि शमी या तिघांपैकी 15 सदस्यीय संघात कुणाची निवड होते आणि स्टँड बायमध्ये कोण राहतं हे पाहणं महत्वाचं ठरेल.

2 ऑक्टोबरला दुसरी टी20

दरम्यान गुवाहाटीत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये मालिकेतली दुसरी टी20 खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी मोहम्मद सिराज भारतीय संघात दाखल होईल. कदाचित त्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्येही सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे. सिराज नुकताच काऊंटी क्रिकेट खेळून भारतात परतला आहे. गेले महिनाभर त्यानं काऊंटी क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. याशिवाय गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही कसोटी मालिकाविजय मिळवून देण्यात सिराजनं मोठा वाटा उचलला होता. याच कारणामुळे टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून सिराजला पुन्हा संघात स्थान दिलं गेल्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Jasprit bumrah, T20 cricket, T20 world cup 2022